Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वांद्रे-कुर्ला संकुल पूल दुर्घटनेची चौकशी करण्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे एमएमआरडीए आयुक्तांना आदेश

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
17/09/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
वांद्रे-कुर्ला संकुल पूल दुर्घटनेची चौकशी करण्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे एमएमआरडीए आयुक्तांना आदेश

मुंबई(प्रतिनिधी)- वांद्रे कुर्ला संकुल ते जेव्हीएलआरला जोडणाऱ्या पुलाचा गर्डर कोसळून झालेल्या दुर्घटनेची त्रयस्थ मूल्यमापन संस्था आणि एमएमआरडीएचे अधिकारी मिळून चौकशी करतील अशी घोषणा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

तसेच या घटनेत जखमी झालेल्या कामगारांच्या उपचाराचा खर्च एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास वांद्रे कुर्ला संकुल आणि जेव्हीएलआर यांना जोडणाऱ्या निर्माणाधीन पुलाचा गर्डर अचानक कलंडल्याने 14 कामगार जखमी झाले. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.

ही दुर्घटना दुर्दैवी असून दुर्घटनेला जो कुणी जबाबदार असेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. ही दुर्घटना गर्डरचे बेअरिंग आणि नट बोल्ट यांच्यात त्रुटी राहिल्याने झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले, तरीही त्याची पूर्ण चौकशी करून त्यानंतरच दोषींवर कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच अशी दुर्घटना पुन्हा होऊ नये यासाठी नवीन तयार होत असलेल्या पुलांचे मूल्यमापनही त्रयस्थ मूल्यमापन संस्थेकडून करण्याचे निर्देश श्री. शिंदे यांनी एमएमआरडीए आयुक्तांना दिले.

जखमी कामगाराची रुग्णालयात जाऊन घेतली भेट या दुर्घटनेत किरकोळ जखमी झालेल्या 13 कामगारांना उपचार करून रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. तर केवळ एक कामगार डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार घेत आहे. मंत्री शिंदे यांनी व्ही.एन देसाई रुग्णालयात जाऊन या कामगाराची विचारपूस केली. तसेच त्याच्यावर नीट उपचार करण्याच्या सूचना डॉक्टराना दिल्या. यावेळी एमएमआरडीए आयुक्त व्ही. श्रीनिवास राव, स्थानिक पोलीस अधिकारी, एमएमआरडीएचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Previous Post

शहरातील नऊ रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यासाठी महानगरपालिकेने तातडीने ना हरकत प्रमाणपत्र द्यावे -पालकमंत्र्यांचे निर्देश

Next Post

अपर मुख्य सचिवांनी घेतला ‘प्रत्येक शेताला पाणी’ योजनेचा आढावा

Next Post
सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कारासाठी नामांकने पाठविण्याचे आवाहन

अपर मुख्य सचिवांनी घेतला ‘प्रत्येक शेताला पाणी’ योजनेचा आढावा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo