Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वाघूर विभागाचे कार्यकारी अभियंता गोकुळ महाजन यांच्यावर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा

राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) कडून पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता यांना निवेदन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
19/07/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
वाघूर विभागाचे कार्यकारी अभियंता गोकुळ महाजन यांच्यावर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा

जळगाव :- शेततळे निविदा प्रक्रियेत गैरप्रकार करणारे वाघूर धरण विभागाचे कार्यकारी अभियंता गोकुळ महाजन यांना सेवेतून निलंबित करून निविदा प्रक्रियेची चौकशी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जळगाव महानगर राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरचंद्र पवार) ने दिला आहे.यासंदर्भात जळगाव महानगर युवक पदाधिकाऱ्यांनी पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री. भदाणे‌ यांची भेट घेवून निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की,तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव यांच्या नियंत्रणात वाघूर धरण विभाग,जळगाव यांचे अंतर्गत कोट्यवधी रुपयांचे शेततळे तयार केले जात आहे. या शेततळे कामांचा ठेका मिळवून देतो असे आमिष दाखवून वाघूर धरण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.गोकुळ महाजन यांनी ४५ लाख रुपयांची अन्य साथीदार यांच्याशी संगनमत करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा असे आदेश जळगाव येथील न्यायालयाने दिनांक ०९/०७/२०२४ रोजी दिलेले आहेत.कार्यकारी अभियंता श्री.गोकुळ महाजन यांनी जिव्हीपीआर इंजिनिअर्स लिमिटेड या हैद्राबाद येथील कंपनीची शेततळे कामांची निविदा मंजूर करण्यासाठी गैरमार्गाचा अवलंब केला आहे. सदरच्या कंपनीला मध्यप्रदेश राज्यातील इंदिरा सागर परियोजना सागरचे मुख्य अभियंता यांनी काळ्या यादीत टाकले असताना ती बाब दडवून ठेवावी यासाठी श्री.गोकुळ महाजन यांनीच सदरच्या कंपनीला सहकार्य केले आहे. हा गंभीर विषय असून मर्जीतल्या ठेकेदारांना मक्ता मिळावा यासाठी कार्यकारी अभियंता श्री.गोकुळ महाजन यांनी शासकीय कर्तव्यात हयगय करून सेवा शिस्तीचे उल्लंघन केले आहे. यामुळे तापी पाटबंधारे विकास मंडळ यांची जनमानसातील प्रतिमा मलीन होत आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की,सातत्याने वादग्रस्त असलेले वाघूर धरण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.गोकुळ महाजन यांनी शेततळे कामांचा ठेका मिळवून देण्याच्या नावाने आपल्या सहकारी साथीदार यांच्याशी संगनमत करून जळगाव येथील एका व्यक्तीची ४५ लाख रुपयांत फसवणूक केल्याबाबत न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने श्री.गोकुळ महाजन यांना तात्काळ सेवेतून निलंबित करून शेततळे निविदा कामांची विशेष तपास यंत्रणा मार्फत
चौकशी करण्यात यावी. याप्रकरणी ७ दिवसात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे जळगाव महानगर अध्यक्ष रिकु उमाकांत चौधरी यांच्या नेतृत्वात हितेश रवींद्र जावळे, चेतन पवार, शैलेश अभंगे, ललित चौधरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित  होते.

Team Satymev Jayate

Previous Post

आगामी विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे :- मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

Next Post

अंगणवाडीतील संशयित एकूण 94 बालकांची मोफत 2D इको तपासणी, 25 बालकांची होणार शस्त्रक्रिया

Next Post
अंगणवाडीतील संशयित एकूण 94 बालकांची मोफत 2D इको तपासणी, 25 बालकांची होणार शस्त्रक्रिया

अंगणवाडीतील संशयित एकूण 94 बालकांची मोफत 2D इको तपासणी, 25 बालकांची होणार शस्त्रक्रिया

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo