Monday, August 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विक्रोळीतील डॉ.योगेश भालेराव यांची मोफत रुग्णसेवा व इतर सामाजिक कार्ये

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
विक्रोळीतील डॉ.योगेश भालेराव यांची मोफत रुग्णसेवा व इतर सामाजिक कार्ये

मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले

कोरोनाच्या भीतीने अनेक खाजगी डॉक्टरांनी गेल्या २ महिन्यांपासून आपले दवाखाने बंद ठेवले आहेत. यामुळे इतर आजाराने आजारी असलेल्या नागरिकांना डॉक्टरांच्या शोधात वणवण भटकावे लागत आहे. मात्र या कठीण काळात देखील विक्रोळीतील डॉक्टर योगेश भालेराव व त्यांच्या डॉक्टर पत्नी सविता भालेराव रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णालयात हजर राहून मोफत रुग्णसेवा करत आहेत तसेच मोफत औषधे देत आहेत. तसेच विक्रोळीतील अनेक विभागात मोफत वैद्यकीय शिबीर भरून रुग्ण तपासणी करत आहेत. डॉ भालेराव यांनी गेल्या चार दिवसात वैद्यकीय शिबिरे भरवून आतापर्यंत १२५७ नागरिकांची मोफत वैद्यकीय तपासणी केली आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने घोषित केलेल्या लॉकडाऊन मुळे हातावर पोट असणाऱ्यांच्या रोजी-रोटीचा प्रश्‍न निर्माण झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, अश्या परप्रांतीयांना आपल्या गावी जाण्यासाठी मुंबई ते कर्नाटक अशी बसची व्यवस्था देखील भालेराव यांनी करुन दिली आहे. तसेच गरजूंना मोफत धान्य वाटप, मोफत मास्क वाटप, सनिटॉयझयर फवारणी यासारखे अनेक सामाजिक कार्ये देखील ते करत आहेत.

कन्नमवार नगर परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता आहे तसेच आतापर्यंत येथील ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे त्यामुळे येथील अनेक खाजगी दवाखाने बंद आहेत. परंतु लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून विक्रोळीच्या कन्नमवार नगर परिसरात राहणारे डॉ योगेश भालेराव आणि डॉ सविता भालेराव यांनी या परिस्थितीला न भिता स्वतःला नागरिकांच्या सेवेसाठी झोकून दिले आहे. भालेराव दांपत्याने रुग्णसेवेसाठी त्यांचा दवाखाना दिवसभर सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असून मोफत रुग्णतपासणी, मोफत औषधोपचार चालू ठेवले आहेत तसेच कोरोना भीतीमुळे जे रुग्ण घराबाहेर पडत नाही आहेत अश्या रुग्णांच्या घरी जावून उपचार करत आहेत. रस्त्यावर राहणाऱ्या लोकांची देखील ते आठवड्यातून एकदा तपासणी करुन मोफत औषधे देत आहेत. त्यामुळे डॉ योगेश भालेराव आणि डॉ सविता भालेराव यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नवघर रोड पोलिसांची मजुरांसाठी बसेसची सोय

Next Post

राज्यभरात आतापर्यंत १२ हजार ५८३ रुग्णांना घरी सोडले

Next Post
कोरोनाच्या उपचारासाठी मुंबईत लाखभर खाटा उपलब्ध करण्याचा प्रयत्न

राज्यभरात आतापर्यंत १२ हजार ५८३ रुग्णांना घरी सोडले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo