Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विद्यापीठाच्या भरमसाठ शुल्कवाडीच्या विरोधात अभाविप चे आंदोलन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/08/2022
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगाव – (प्रतिनिधी) – आज रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विद्यापीठाने वाढविलेल्या भरमसाठ शुल्कावाडीच्या विरोधात आक्रोश मोर्चा काढण्यात आला व संपूर्ण विद्यापीठ भारत माता की जय , वंदे मातरम , कुलगुरू हमे पढणे दो, देश को आगे बढणे दो अश्या घोषणांनी गजबजले होते. त्या वेळी मोठया संख्येने विद्यार्थी सहभागी झाले. याप्रसंगी प्रांत मंत्री कु अंकिता पवार यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले त्या म्हणाल्या की उत्तर महाराष्ट्रात शिक्षण घेणाऱ्या लाखो सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक स्रोत म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची ओळख आहे. तरी अशी अचानक इतक्या प्रमाणात शुल्क वाढ करणे चुकीचे असून हा निर्णय विद्यापीठाने तात्काळ मागे घ्यावा.


विद्यापीठामार्फत सुमारे 40% ते 73% पर्यंत शुल्क वाढ करण्यात आलेली आहे. या शुल्क वाढीचा फटका विभागातील गरीब विद्यार्थी, शेतकऱ्यांच्या मुलांना बसणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात शुल्क वाढ करणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे विद्यापीठातील गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची दारे बंद होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून ही अन्यायकारक शुल्कवाढ तातडीने कमी करावी व विद्यार्थी केंद्रबिंदू मानून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. अशी मागमी अ भा वि प ने मा.कुलगुरू महोदयांन कडे केली. प्रसंगी विभाग संयोजक कल्पेश सोनवणे,प्रांत शोध कार्य संयोजक अश्विन सुरवाडे , जिल्हा संयोजक मयूर माळी , महानगर मंत्री रितेश महाजन , चैतन्य बोरसे , नितेश चौधरी, भूमिका कानडे,पवन बावस्कर , हांसराज चौधरी, चेतन नेमाडे, प्रीतम निकम , वैभवि ढिवरे,मोनाली जैन मनीष चव्हाण योगेश अहिरे , आदित्य चौधरी व संपूर्ण विभागातून कार्यकर्ते उपस्थित होते, अशी माहिती ABVP चे जिल्हा कार्यालय प्रमुख सारंग कोळी यांनी दिली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भल्याभल्यांना न जमणारे काम दिव्यांगांनी केले, साकारले शाडू मातीचे बाप्पा!

Next Post

खुनप्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता

Next Post

खुनप्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo