Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतदानापुर्वी १८ आणि १९ नोव्हेंबरला शाळांना सुट्टी नाही- शिक्षण आयुक्त सूरज मांढरे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/11/2024
in जळगाव, शैक्षणिक
Reading Time: 1 min read
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतदानापुर्वी १८ आणि १९ नोव्हेंबरला शाळांना सुट्टी नाही- शिक्षण आयुक्त सूरज मांढरे

जळगाव – ( जिमाका )- भारत निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचे मतदान पार पडणार आहे.निवडणुकीत जास्तीत जास्त लोकांना आपला मतदान हक्क बजावता यावा या करीता २० नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र राज्यात मतदानाच्या दिवशी शाळांना सुट्टी असली, तरी मतदानाच्या आधी २ दिवस सुट्टीवरुन शाळा व्यवस्थापन, पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तरी शिक्षण विभागाने यासंदर्भात एक परिपत्रक सादर करत सर्व गोंधळ दुर केला आहे. शासन आदेशानुसार राज्यात १८ आणि १९ नोव्हेंबरला शाळा सुरूच राहणार आहेत. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी एका परिपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

परिपत्रकानुसार १८ व २० नोव्हेंबर रोजी म्हणजेच मतदानाच्या २ दिवस आधी शाळांना कोणतीही सार्वत्रिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही. केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाल्यामुळे एकही शिक्षक शाळेत उपलब्ध असणार नाही, अशा शाळांबाबत स्थानिक स्तरावर मुख्याध्यापतक यांनी त्यांच्या अधिकारात सुट्टी जाहीर करावी. अशा शाळा वगळता उर्वरित सर्व शाळा नियमितपणे सुरु राहतील. विशिष्ट शाळांना स्थानिक पातळीवर मुख्याध्यापक यांनी सुट्टी जाहीर करावी. तसेच ही सरसकट व सार्वजनिक सुट्टी नाही याची नोंद सर्वांनी घेऊन कोणत्याही शाळा अनावश्यकरित्या बंद राहणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आवाहन शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

चिमुरडीचे अनोखे प्रेम : “विजयी भव” ग्रीटिंग कार्ड देऊन आ. राजूमामांना शुभेच्छा;बालदिनानिमित्त आ. भोळेंनी भरवली मिठाई

Next Post

दृष्य कथा, बोलक्या गोष्टींसह चित्रांचा संग्रह जळगावकरांसाठी प्रेरणादायी;एपिक’ फोटो प्रदर्शनाची सुरवात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo