Sunday, August 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विविध मुस्लिम सामाजिक संस्थांतर्फे ना.गुलाबराव पाटील यांचा सत्कार;विविध मागण्यांचे निवेदन सादर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव-(प्रतिनिधी) – येथील विविध मुस्लिम सामाजिक संस्था, संघटना व बिरादरीच्या पदाधिकारी व प्रतिनिधीतर्फे अजिंठा शासकीय विश्रामगृहात मा.ना.गुलाबरावजी पाटील यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच राज्याचे मुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील मंत्री आणि पालकमंत्री यांच्या अभिनंदनाचे पत्र वजा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात केले. या निवेदनात शिवसेना पक्षप्रमुख मा.ना.उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याबद्दल आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी मंत्र्यांसह मा.ना.गुलाबराव पाटील यांची महाराष्ट्र राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या मंत्रिपदी आणि जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि राज्याच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संकल्पनेतील लोककल्याणकारी, सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेऊन सर्वांना समान संधी, न्याय, वागणूक द्यावी. आणि लोकाभिमुख, पारदर्शी व गतिमान राज्यकारभार करावे,अशी आशा व अपेक्षा देखील व्यक्त करण्यात आल्या.
त्याचप्रमाणे पश्चिम बंगाल, पंजाब,केरळ, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) असंविधानिक असून हा कायदा लागू करण्यास नकार दिलेला आहे.आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने विधिमंडळात ठराव मंजूर करून केंद्र सरकारला नकार कळवावा,राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही (NPR) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदवही (NRC) यांच्या प्रक्रिया आणि डिटेंशन सेंटरची परवानगी रद्द करावी तसेच राज्यातील अल्पसंख्याक लोकसमूहांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक अशा सर्वसमावेशक उत्कर्षासाठी आणि अल्पसंख्यांकांच्या हिताचे व हक्काचे संरक्षण व्हावे तसेच अल्पसंख्याक समाजातील नागरिकांचे प्रश्न व समस्या जलदगतीने सुटून त्यांना न्याय मिळावा, अशा मागण्या करण्यात आल्यात. सत्कार करतांना व निवेदन देतांना अशफाक पिंजारी – जिल्हाध्यक्ष, मुस्लिम समन्वय समिती,सैय्यद शाहिद – अध्यक्ष, अमन एज्युकेशन सोसायटी, फारूक कादरी – कादरिया फौंडेशन,नजीर खान मुलतानी – अध्यक्ष, एकता फौंडेशन, फिरोज खान मुलतानी – जळगाव मनपा प्रभाग समिती क्र.३ ,मा. सदस्य ,अशफाक मिर्ज़ा – अध्यक्ष, खान्देश टू व्हिलर असोसिएशन,शरीफ बाबा – अध्यक्ष, परवाझ फौंडेशन,रोशन पिंजारी – उपाध्यक्ष,पिंजारी युवा बिरादरी,शकील टिक्की – झोनल सेक्रेटरी,ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशन,रईस बागवान – अध्यक्ष, लब्बैक फाउंडेशन, रियाज़ काकर – अध्यक्ष, जळगाव जिल्हा काकर समाज,अल्ताफ़ मन्यार – सेक्रेटरी, अमन एज्युकेशन सोसायटी,कासीम खाटीक – अध्यक्ष, खाटीक बिरादरी,अन्वर सिकलीगर – अध्यक्ष, शिकलगर समाज,युसुफ खान – अध्यक्ष, सहयोग बहुउद्देशीय संस्था,मुन्नी शकील मन्यार – अध्यक्षा, सहेली ग्राम महिला बचत गट संघटना,शरीफ शाह – अध्यक्ष, शाह छप्परबंद जमात आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

श्री समर्थ विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

Next Post

खान्देशस्तरीय अग्रवाल समाजाचा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न

Next Post

खान्देशस्तरीय अग्रवाल समाजाचा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo