Thursday, July 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विशेष रेल्वेने बिहारचे बाराशे कामगार रवाना

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
विशेष रेल्वेने बिहारचे बाराशे कामगार रवाना

अमरावती, दि. १० : अमरावती विभागातील विविध जिल्ह्यांत अडकलेल्या बिहारमधील १ हजार २३६ कामगार बांधवांना स्वगृही पोहोचविण्यासाठी विशेष श्रमिक एक्प्रेस आज अमरावती रेल्वे स्थानकावरून बिहारमधील बरौनीकडे रवाना झाली.

Maha Info Corona Website

अमरावती विभागात अडकलेल्या कामगार बांधवांना स्वगृही सोडण्यासाठी ही विशेष श्रमिक एक्स्प्रेस विनाथांबा बरौनीपर्यंत जाणार आहे. ही एक्स्प्रेस २४ डब्यांची असून, त्यातून १ हजार २३६ प्रवासी नागरिक रवाना झाले. विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्यासह महसूल, रेल्वे, पोलीस प्रशासनाचे अनेक अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.  

रेल्वेस्थानकावर प्रथमत: सर्व प्रवासी नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांच्या भोजन, चहा, पाणी व इतर व्यवस्था करण्यात आली. त्यासाठी नानकरोटी उपक्रमाचे सहकार्य मिळाले.  विभागातून ठिकठिकाणाहून आलेल्या प्रवाश्यांच्या चेह-यावर घरी परतण्याचा आनंद दिसत होता.

संचारबंदीमुळे अनेक दिवसांपासून अडकून होतो. मात्र, शासनाने आमची दखल घेऊन विशेष ट्रेनची व्यवस्था केली. त्यामुळे आम्ही अनेक दिवसांनी घरी परत जाऊ शकत आहोत. आमच्या कुटुंबियांना, नातेवाईकांना अनेक दिवसांनी भेटता येणार आहे. घरी परतण्याचा आनंद मोठा आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी अनेकांनी व्यक्त केली. महिला, बालके यांचाही समावेश प्रवाश्यांत होता.  

लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात होताच शासनाने विविध ठिकाणी अडकलेल्या नागरिकांच्या परतीचा मार्ग मोकळा केला आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर आणि जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी इतर राज्यांचे सचिव, संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला. त्यानुसार नियोजन करण्यात आले असून, स्थानिक प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. भोजन व इतर व्यवस्थेसाठी विविध स्वयंसेवी संस्थांचेही या उपक्रमाला मोठे सहकार्य मिळत आहे.  

जिल्ह्यात अडकलेल्या इतरही नागरिकांना स्वगृही पोहोचविण्यासाठी नियोजन केले असून, सर्वांनी संयम ठेवावा. कुणीही पायी जाऊ नये, असे आवाहन पालकमंत्री ॲड. ठाकूर यांनी केले आहे. लवकरच झारखंड येथील प्रवाश्यांना स्वगृही पोहोचविण्यासाठी विशेष ट्रेन सोडण्यात येणार असून, त्याचे नियोजन होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मराठी पाऊल पडावे पुढे- मंगेश कोळी

Next Post

भारती काळे यांना अहिल्याबाई होळकर पुरस्कार जाहीर

Next Post
भारती काळे यांना अहिल्याबाई होळकर पुरस्कार जाहीर

भारती काळे यांना अहिल्याबाई होळकर पुरस्कार जाहीर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

भूकरमापक १५ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

भूकरमापक १५ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून जमिनीचा पोत जपा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून जमिनीचा पोत जपा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतकरी कर्जमुक्तीचा राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतकरी कर्जमुक्तीचा राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo