Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विषबाधा झालेल्या तीन वर्षीय बालिकेवर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात यशस्वी उपचार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
विषबाधा झालेल्या तीन वर्षीय बालिकेवर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात यशस्वी उपचार
जळगाव - विषबाधा झालेल्या रावेर तालुक्यातील तीन वर्षीय बालिकेवर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातील पीआयसीयु विभागातील बालरोग तज्ञांनी केलेले उपचार यशस्वी ठरले. डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे बालिकेला जीवदानच मिळाले.

रावेर तालुक्यातील तीन वर्षीय बालिका ही घरात खेळत असतांना पाणी समजून काहीतरी विषारी द्रव्य सेवन केले. द्रव्य सेवनानंतर या बालिकेला अस्वस्थ वाटू लागले. ही बाब बालिकेच्या आईच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लागलीच स्थानिक रूग्णालयात धाव घेतली. मात्र स्थानिक डॉक्टरांनी बालिकेला इतरत्र हलविण्यास सांगितले. अशा परिस्थीतीत कुटूंबियांनी बालिकेला तातडीने डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या पीआयसीयु विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या ठिकाणी बालरोग तज्ञ डॉ. विनय पाटील यांनी बालिकेची तपासणी करून उपचाराला सुरवात केली. बालिकेने सेवन केलेले विषारी द्रव पदार्थ काढण्यात वैद्यकीय तज्ञांना यश आले. विषारी पदार्थ काढल्यानंतर बालिका अवघ्या एका दिवसात शुध्दीवर येऊन तीच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होऊ लागली. दुसर्‍याच दिवशी बालिकेची प्रकृती धोक्याबाहेर आली. रूग्णालयातील बालरोग तज्ञ डॉ. विनय पाटील यांच्यासह टीमने केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे बालिकेला पुन्हा जीवदानच मिळाले. 

					वेळ आणि उपचार महत्वाचे - डॉ. विनय पाटील 

तीन वर्षीय बालिकेने विषारी द्रवपदार्थ सेवन केल्यानंतर तीची प्रकृती अधिकच बिघडली होती. मात्र तीच्या कुटूंबियांनी तीला वेळेत रूग्णालयात दाखल केल्याने गोल्डन अवर्समध्ये उपचार करणे शक्य झाले. अशा रूग्णांसाठी वेळ आणि उपचार हे महत्वाचे असतात असे बालरोग तज्ञ डॉ. विनय पाटील यांनी सांगितले. 
                            
                                     सर्व सुविधा व डॉक्टरामूळेच जिवदान — रूग्णांचे नातेवाइक

या रूग्णालयात सर्व अत्याधुनिक सुविधा एकाच छताखाली उपलब्ध असून रूग्णांवर ताबडतोब उपचार करत असतांना डॉक्टरांनी केलेले मार्गदर्शन यामूळे चिंता दूर झाली. या रूग्णालयातील कर्मचा—यांनी देखिल सहकार्य केले. त्यामूळैच आमचे बाळ सुखरूप असून रूग्णालय प्रशासनाचे आभार मानावे तेवढे कमी असल्याची भावना नातेवाईकांनी बोलून दाखवली. 
टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भाजपचे आंदोलन ट्रोल – महाविकास आघाडीकडून ‘महाराष्ट्रद्रोही BJP ‘ ट्रेंडन उत्तर

Next Post

उस्मानाबाद जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोनाचे १९ रुग्ण

Next Post
सुधारित जळगाव जिल्ह्यात आज २० कोरोना बाधित रूग्ण आढळले

उस्मानाबाद जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोनाचे १९ रुग्ण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo