Tuesday, September 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

व्हिजन २०२८ ऑफ स्टॉक मार्केट या विषयावर विनामूल्य लाइव्ह टॉक शो;किरण जाधव ॲण्ड असोसिएटसचा अभिनव उपक्रम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/04/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
व्हिजन २०२८ ऑफ स्टॉक मार्केट या विषयावर विनामूल्य लाइव्ह टॉक शो;किरण जाधव ॲण्ड असोसिएटसचा अभिनव उपक्रम

जळगाव (प्रतिनिधी) : शेअर बाजाराचे विख्यात तंत्रविश्लेषक आणि किरण जाधव ॲण्ड असोसिएटसचे सीएमडी किरण जाधव हे शहरात येत असून, त्यांचेसमवेत प्रख्यात तंत्रविश्लेषक आशिष केळकर आणि ज्ञानेश्वर बढे यांचा ‘व्हिजन २०२८ ऑफ स्टॉक मार्केट’ या विषयावर दि. ३० एप्रिल रोजी छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात रात्री ८ ते १० या वेळात आयोजित करण्यात आला आहे.
आज गुंतवणुकीच्या अनेक पर्यायांमध्ये अग्रक्रमाने नाव घ्यावे लागते ते शेअर मार्केटचे. पूर्वी आपल्या भागात केवळ मोजक्या लोकांपुरते मर्यादित असणाऱ्या या क्षेत्राकडे कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीनंतर सामान्य माणूसदेखील वळला आहे.

मात्र पुरेसे ज्ञान नसल्याने, त्यात तो काही प्रमाणातच यशस्वी होत आहे. मात्र या क्षेत्राचे सखोल ज्ञान प्राप्त झाल्यास या क्षेत्रातील गुंतवणुकीच्या संधीचे सुवर्णसंधीत रुपांतर करणे त्यांना शक्य होणार आहे. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून, ‘व्हिजन २०२८ ऑफ स्टॉक मार्केट’ या विषयावर लाइव्ह टॉक शो च्या माध्यमातून शेअर बाजाराचे विख्यात तंत्रविश्लेषक आणि किरण जाधव ॲण्ड असोसिएटसचे सीएमडी किरण जाधव यांच्यासमवेत प्रख्यात तंत्रविश्लेषक आशिष केळकर आणि ज्ञानेश्वर बढे शहरवासियांना विनामूल्य मार्गदर्शन करणार आहेत.

सद्यस्थितीत रशिया आणि युक्रेन यांच्या युध्दजन्यपरिस्थिती तसेच कोरोनाच्या नवीन व्हेरीयंटच्या भीतीने शेअर मार्केटमधील गुंतवणूक कमी झाली आहे. त्यामुळे साहजिकच शेअर मार्केटचा निर्देशांक खाली घसरला आहे. या परिस्थितीत गुंतवणूकीच्या काय संधी आहेत तसेच उद्याचा भारत हा आर्थिक महासत्ता होण्याच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या संधी, तसेच तुमच्याजवळ असलेल्या सद्यस्थितीतील शेअर्स, ज्यांचा केवळ दर वाढत नसल्याने, ते सांभाळून ठेवण्यात आले आहेत, अशा शेअर्सचे काय करावे? याविषयावर या टॉक शोमध्ये सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हा टॉकशो विनामूल्य असला तरी त्यात सहभागी होण्यासाठी पूर्व नावनोंदणी आवश्यक असून, नाव नोंदणीकरिता ९८२३३३६५२४ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन बढे कॅपिटल्सतर्फे करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” वर्षानिमित्त ग्रामीण रुग्णालय यावल येथे आयोजित भव्य मोफत आरोग्य मेळावा संपन्न

Next Post

थॅलेसिमिया ग्रस्त मुलांच्या जीवनाला गवसला सूर! कोसला फाउंडेशन तर्फे संगीत विद्यालय उपक्रम

Next Post
थॅलेसिमिया ग्रस्त मुलांच्या जीवनाला गवसला सूर! कोसला फाउंडेशन तर्फे संगीत विद्यालय उपक्रम

थॅलेसिमिया ग्रस्त मुलांच्या जीवनाला गवसला सूर! कोसला फाउंडेशन तर्फे संगीत विद्यालय उपक्रम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo