Sunday, June 28, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शनिवार, रविवार दुकाने उघडण्यास जिल्हाधिकारी सकारात्मक!जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट : मनपा आयुक्तांशी करणार चर्चा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/10/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
शनिवार, रविवार दुकाने उघडण्यास जिल्हाधिकारी सकारात्मक!जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट : मनपा आयुक्तांशी करणार चर्चा

जळगाव, दि.५ – शहरातील सर्व दुकाने आठवड्याचे सात दिवस सकाळी ९ ते रात्री ९ यावेळेत उघडी रहावी, यासाठी जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेतली. जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला असून मनपा आयुक्त रजेवरून हजर झाल्यावर याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मिशन बिगीन अगेन अंतर्गत टप्प्याटप्प्याने दुकाने आणि इतर सुविधा सुरू होत असल्या तरी जळगाव शहरात मात्र अद्यापही शनिवार, रविवार दुकाने बंदच ठेवण्याचे आदेश आहेत. तसेच दररोज सकाळी ९ ते रात्री ७ पर्यंतच उघडण्यास प्रशासनाने अनुमती दिलेली आहे. व्यापाऱ्यांची अडचण लक्षात घेता जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाच्यावतीने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन देऊन त्यांची भेट घेण्यात आली. यावेळी जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाचे सचिव ललित बरडीया, कार्याध्यक्ष सुरेश चिरमाडे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांनी व्यापारी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करीत मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. दुकानांची वेळ वाढविण्यासंदर्भात शासनाच्या निर्देशानुसार निर्णय घेण्यात येईल तर शनिवार आणि रविवारी दुकाने उघडी राहावी, यासाठी लवकरच आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जामनेर पंचायत समितीचे प्रभारी राज संपुष्टात;श्रीमती जे व्ही कवडदेवी यांनी स्वीकारला पदभार

Next Post

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शिष्यवृत्ती व फ्रीशीपबाबत विद्यार्थी व महाविद्यालयांसाठी सुचना

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo