Saturday, August 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/07/2025
in जळगाव, लाइफस्टाइल
Reading Time: 1 min read
शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

जळगाव -(प्रतिनिधी)-दिनांक १९ जुलै रोजी श्री. चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेज व श्री. पी. ई. तात्या पाटील हॉस्पिटल च्या मार्फत शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव येथे मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराच्या आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान सुप्रीम कॉलनी परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घेतला.यावेळी होमिओपॅथी तज्ञ डॉ. सिद्धेश्वर पाटील यांनी रुग्णांची आरोग्य तपासणी केली तसेच नेत्रचिकित्सक डॉ. जयेश वाल्हे यांनी नेत्र तपासणी केली. या सर्व रुग्णांना मोफत होमिओपॅथी औषधी देण्यात आली तसेच मोतीबिंदू असलेल्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच शिबिरात आलेल्या रुग्णांना डॉक्टरांनी मोफत मार्गदर्शन केले. कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स हर्षदा पाटील, श्रद्धा चौधरी, प्राची खालसे, देवयानी चव्हाण उपस्थित होते.तसेच शाळेतील प्राथमिक मुख्याध्यापक गोविंदा लोखंडे, नितीन अटवाल, भागवत भावसार, मनीषा चौधरी इ. शिक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते.

श्री.चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष मा.श्री. पी. ई. तात्या पाटील, सचिव मा. राहुल पाटील सर,प्राचार्य. डॉ.सुधांशू सिंग, रुग्णालय अधीक्षक श्री. डॉ.नरेंद्र शर्मा, यांच्या मार्गदर्शनाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी श्री. नवल परदेशी, शाळेचे मुख्याध्यापिका. श्रीमती संगीता पाचपांडे, श्री.यशवंत गुजर सर यांनी मेहनत घेतली.
तसेच प्रत्येक महिन्याला मोफत आरोग्य तपासणी करून देण्याचे आश्वासन श्री.चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेज त्यांच्याकडून देण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

दहिगाव ग्रामपंचायत कडून माहिती अधिकार कायद्याला केराची टोपली

Next Post

माध्यमिक शिक्षण विभागाला माहिती अधिकार कायद्याचा विसर – ॲड. दिपक सपकाळे

Next Post
Private:

माध्यमिक शिक्षण विभागाला माहिती अधिकार कायद्याचा विसर - ॲड. दिपक सपकाळे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo