Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शाळकरी विद्यार्थी मांडणार त्यांच्या मनातील ‘जळगावची छबी’

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/07/2022
in राज्य, सामाजिक
Reading Time: 1 min read
शाळकरी विद्यार्थी मांडणार त्यांच्या मनातील ‘जळगावची छबी’

फिस्ट फाऊंडेशन व इनरव्हील क्लब ऑफ न्यू जेन राबविणार निबंध स्पर्धा

जळगाव, दि.१९ – जळगाव शहर, स्वच्छ शहर, सुंदर शहर, हरित शहर असे ब्रीद वाक्य असलेली जळगाव शहर महानगरपालिका. जळगाव शहराचा विकास रखडला, रस्ते खड्ड्यात हरवले, वृक्षतोड वाढली, कचऱ्याचे ढीग दिसू लागले हे सर्व असताना देखील जळगावचा विकास होईल आणि एक स्वप्नातील जळगाव सत्यात उतरेल अशी आशा लावून जळगाव शहरवासी बसले आहेत. शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील असलेल्या फिस्ट फाऊंडेशन व इनरव्हील क्लब ऑफ न्यू जेनतर्फे जळगाव शहरात शालेयस्तरावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

जळगाव शहरातील फिस्ट फाऊंडेशन आणि इनरव्हील क्लब ऑफ न्यू जेनतर्फे जळगाव शहरातील मराठी, इंग्रजी माध्यमातील शाळेत इयत्ता सहावी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि.२१ जुलै ते ५ ऑगस्ट २०२२ पर्यंत स्पर्धेचा कालावधी असून मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी जळगाव : स्वच्छ शहर, सुंदर शहर, हरित शहर जळगाव तर इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी My Dream City Jalgaon असा विषय निश्चित करण्यात आला आहे. निबंध लेखन करताना सुंदर हस्ताक्षरात आपल्या शाळेत जमा करावयाचा असून निबंध A4 कागदावर लिहून वर स्वतःचे नाव, पत्ता, वर्ग, संपर्क क्रमांक, स्पर्धेचा विषय स्पष्टपणे लिहिणे आवश्यक आहे.

निबंध लेखनात चांगले प्रशस्त रस्ते, हिरवेगार शहर, मनोरंजन, क्रीडा मैदाने, स्वच्छता, साफसफाई, आरोग्य, शिक्षण व्यवस्था हे मुद्दे समाविष्ट करणे आवश्यक आहे. स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना ट्रॉफी, सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र, सहभागी शाळा प्रशासनाला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. निबंध स्पर्धेसाठी जळगाव शहरातील विविध शाळा प्रशासनाशी संपर्क करण्यात येत असून त्याव्यतिरिक्त कुणाला स्पर्धेत सहभागी व्हायचे असल्यास फिस्ट फाऊंडेशनचे सदस्य चेतन वाणी – 9823333119, सकीना लेहरी – 9423913968, कल्पक सांखला – 8055807393, इशिता दोशी – 9325399997, नेहा संघवी – 9028811127 यांच्याशी तसेच लभोनी संकुल, नूतन मराठा महाविद्यालय जवळ, प्रशांत पब्लिकेशन समोर, जळगाव याठिकाणी किंवा [email protected] यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

बी.एम.जैन उर्दू प्राथमिक शाळेत वृक्षारोपण

Next Post

आपल्या श्वासाप्रमाणे झाडे जपा – न्या. ए. ए. शेख साईविहार काॕलनीमध्ये वृक्षारोपण

Next Post
आपल्या श्वासाप्रमाणे झाडे जपा – न्या. ए. ए. शेख साईविहार काॕलनीमध्ये वृक्षारोपण

आपल्या श्वासाप्रमाणे झाडे जपा - न्या. ए. ए. शेख साईविहार काॕलनीमध्ये वृक्षारोपण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo