Friday, June 26, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात दिवसभर २९१ दिव्यांगांची तपासणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/01/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात दिवसभर २९१ दिव्यांगांची तपासणी

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बुधवारी २० जानेवारी रोजी दिव्यांग मंडळात सुमारे २९१ लाभार्थ्यांनी उपस्थिती देऊन दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्याबाबतची कार्यवाही पूर्ण केली.

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बुधवार दि. २३ डिसेंबर २०२० पासून दिव्यांग मंडळ अद्ययावत सुविधांसह कार्यान्वित झाले आहे.
दिव्यांग मंडळ अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना दर बुधवारी प्रमाणपत्र मिळण्याबाबतची कार्यवाही सुरु झाली. सकाळी ८ वाजेपासून नाव नोंदणी करण्यासाठी दिव्यांग बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली होती. त्यांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी सकाळी ९ ते १ वाजेदरम्यान करण्यात आली. तपासणी मुख्य गेट नं. २ कडील अधिष्ठाता कार्यालयासमोरील दिव्यांग मंडळाच्या कार्यालयात झाली. तपासणीसाठी कुठलीही फी आकारली जात नाही.

दिवसभरात अस्थिव्यंग १९५, दृष्टीदोष ३८, कान-घसा २०, मानसिक ३८ अशा विविध दिव्यांगत्व असलेल्या सुमारे २९१ लाभार्थ्यांनी लाभ घेतला. यावेळी प्र.अधिष्ठाता तथा दिव्यांग मंडळाचे समन्वयक डॉ. मारुती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार यांच्यासह तज्ज्ञ डॉ. प्रवीण पाटील, डॉ. राजेंद्र अग्रवाल, डॉ. अजय सोनवणे, डॉ. गिरीश राणे, डॉ. पियुषकुमार टाक, डॉ. कांचन नारखेडे, डॉ.योगेश गांगुर्डे यांनी दिव्यांगांची तपासणी केली. कर्मचारी गोपाल सोलंकी, चेतन निकम, आरती दुसाने, दत्तात्रय पवार, विश्वजीत चौधरी यांनी सहकार्य केले.

दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी शासकीय संकेतस्थळ (www.swavlambancard.in) येथे जाऊन (Apply for Disability certificate & UDID card) या लिंकवर जाऊन अर्ज भरणे आवश्यक आहे. तेथे प्रमाणपत्र नूतनीकरणची देखील लिंक उपलब्ध आहे. या अर्जाची प्रिंट काढून अर्जासह आधारकार्ड, रेशनकार्ड, पासपोर्ट २ फोटो व जुने दिव्यांग प्रमाणपत्र तथा संबंधित कागदपत्र घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दर बुधवारी लाभार्थ्यांनी उपस्थित राहावे. येथील प्रक्रिया झाल्यावर प्रमाणपत्र घरपोच तसेच पुढील आठ दिवसात (www.swavlambancard.in) या संकेतस्थळावरून प्रिंट काढून लाभार्थ्याला मिळू शकणार आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करा या मागणीसाठी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Next Post

‘पीओपी’ मुर्त्यांवरील बंदी कायमस्वरूपी उठवावी;खान्देशातील मूर्तिकारांचा जळगावात मोर्चाद्वारे ‘आक्रोश’

Next Post
‘पीओपी’ मुर्त्यांवरील बंदी कायमस्वरूपी उठवावी;खान्देशातील मूर्तिकारांचा जळगावात मोर्चाद्वारे ‘आक्रोश’

'पीओपी' मुर्त्यांवरील बंदी कायमस्वरूपी उठवावी;खान्देशातील मूर्तिकारांचा जळगावात मोर्चाद्वारे 'आक्रोश'

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo