Monday, May 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शासनाच्या कल्याणकारी योजना ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचवा – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/07/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
शासनाच्या कल्याणकारी योजना ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचवा – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

भंडारा दि. ११ : टाळेबंदीचा फटका  सर्वांना बसला असून विशेषत: ग्रामीण भागातील शेतकरी व मजुरांची आर्थिक घडी बिघडली आहे. याची जाणीव ठेवून शासनाच्या कल्याणकारी योजना ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम ग्रामसेवक, तलाठी व पोलीस पाटील, कृषी सहायक  यांनी करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. लोकांनी माझ्यावर जो विश्वास दाखविला तो सार्थ ठरविण्यासाठी पदाचा उपयोग क्षेत्राच्या सर्वांगिण विकासासाठी करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

Maha Info Corona Website

लाखांदूर तालुक्यातील सोनी  येथे ४१.४५ लाख खर्चून नळ योजना व जलशुद्धीकरण व चप्राड येथे ८८.७३ लाख खर्चून  नळ योजना व जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण व जिल्हा परिषद शाळांच्या नवीन खोल्यांचे उद्घाटन विधानसभा अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोगरे, जिल्हापरिषद सदस्य प्रदीप बुराडे, पंचायत समिती सदस्य राजाभाऊ ठाकरे, सोनीच्या संरपंच कल्पना खंडाते, उपअभियंता संजय मारबते, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई उपस्थित होते.

पाणी हे जीवन आहे, शुद्धपाणी सोनी व चप्राड वासियांना  मिळवून देण्याचे काम लोकप्रतिधीच्या हस्ते झाले ही आनंदाची बाब आहे. गावच्या सरपंच या महिला आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेत आदिवासी, अनुसूचित जाती, ओबीसी व  भटक्या विमुक्त जाती व जमातीच्या महिला प्रतिनिधींना संधी मिळावी ही स्व. राजीव गांधी यांची संकल्पना होती. आज ती प्रत्यक्षात दिसत आहे, असे विधानसभा अध्यक्षांनी सांगितले.

विकास आराखडा प्रत्यक्षात उतरविताना येणाऱ्या काळात विधानसभा क्षेत्रातील तीनही तालुक्यात  उद्योग उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी क्षेत्रातील सर्व तहसीलदारांनी जागेची निवड करुन जागा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश त्यांनी दिले. सर्व तालुक्यांना समान न्याय देऊन टाळेबंदीच्या काळात सर्वांना रोजगार देण्यासाठी समावून घेण्यात येईल, असे विधानसभा अध्यक्षांनी यांनी सांगितले.

७०० रुपये धानाला बोनस दिल्यामुळे गोंदिया व भंडारा येथील धानाच्या उत्पन्नात एकदम दुप्पट व तिप्पटीने वाढ झाली असून यामध्ये व्यापाऱ्यांचे धान असल्याचे कळते. त्यामुळे शेतकऱ्यांना बोनस रोवणीच्या वेळी अनुदान स्वरुपात देण्यात येईल, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही अशा सूचना शासनास दिल्याचे त्यांनी सांगितले. कर्जमाफी सरसकट देण्याचा या सरकारचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्याचे विभाजन होऊन ११ वर्ष झाले तरी जंगलांचा प्रश्न जसाच्या तसा होता. तो आता सुटला असून लांखांदूर-इंदोरा भागातील सर्व जंगल भंडारा जिल्ह्यात वळता करण्यात आला असून नागरिकांना जो त्रास सहन करावा लागत होता त्यापासून त्यांची सुटका झाली आहे. 

सोनी आवळी पुलासह बंधाऱ्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. तसेच चप्राड विहिरगाव पूल बंधाऱ्याच्या कामास लवकरच सुरुवात होणार असून यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या समस्या सुटणार आहेत. जिल्ह्यात चुलबंद नदीवर ज्या ठिकाणी पुल आहे तिथे बंधारा बांधण्याचे प्रायोजित असून यामुळे शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रारंभी सोनी व चप्राड येथील जलशुद्धीकरण केंद्र व जिल्हा परिषद शाळांच्या नवीन खोल्यांचे उद्घाटन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सोनी चप्राड येथील लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज २५३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post

तालुक्यात बाहेरून येणाऱ्यांनी प्रशासनाला योग्य व वेळेत माहिती द्यावी

Next Post
तालुक्यात बाहेरून येणाऱ्यांनी प्रशासनाला योग्य व वेळेत माहिती द्यावी

तालुक्यात बाहेरून येणाऱ्यांनी प्रशासनाला योग्य व वेळेत माहिती द्यावी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

निधन वार्ता – रमेश प्रभाकर नाईक यांचे निधन

निधन वार्ता – रमेश प्रभाकर नाईक यांचे निधन

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d