Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शिंदे इंटरनॅशनल स्कूलमध्ये चित्रफित प्रदर्शित करुन विद्यार्थ्यांना दिवाळीचे महत्व दिले पटवून

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
03/11/2021
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
शिंदे इंटरनॅशनल स्कूलमध्ये चित्रफित प्रदर्शित करुन विद्यार्थ्यांना दिवाळीचे महत्व दिले पटवून

पाचोरा(प्रतिनिधी)- येथील गिरणाई शिक्षण संस्था संचलित शिंदे इंटरनॅशनल स्कूल मध्ये दिवाळी विशेष माहितीपूर्ण चित्रफित प्रदर्शित करून विद्यार्थ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या चित्रफितीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. शिंदे इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे यांच्या प्रेरणेतून प्राचार्य डॉ.विजय पाटील यांनी पुढाकार घेऊन यंदा विदयार्थ्यांना दीपावलीच्या आगळ्यावेगळ्या शुभेच्छा दिल्या.

भारतात विविध धर्मीयांचे सण-उत्सव होत असले तरी हिंदू धर्मियांचा दिवाळी सण सर्वच भारतीय मोठ्या उत्साहाने साजरा करतात. सहा दिवस चालणाऱ्या या दिवाळी सणात वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा व भाऊबीज आदी उत्सवांचा सहभाग असतो. या सर्वच उत्सवांची थोडक्यात एकत्र मांडणी करून एक माहितीपूर्ण चित्रफीत शिंदे इंटरनॅशनल स्कूल तर्फे प्रदर्शित करण्यात आली. संस्थेचे सहसचिव शिवाजी शिंदे लिखित या चित्रफिती मध्ये संस्था अध्यक्ष व परिवार तसेच शिंदे इंटरनॅशनल स्कूलचे, प्राचार्य, महिला शिक्षकांनी सहभाग नोंदवला.

दिवाळी सणाचे धार्मिक महत्व, पावित्र्य, कौटुंबिक आनंदोत्सव या सर्व बाबीचे सादरीकरण अलगद टिपण्यात आले. अल्टिमेट स्टुडिओचे संचालक अमोल पाटील यांचे तांत्रिक सहकार्य लाभले आहे. ही चित्रफित सर्व विद्यार्थी पालक यांच्या पसंतीला उतरली असून या चित्रफिती बाबत शिंदे इंटरनॅशनल स्कूलचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

राज्यात ३० नोव्हेंबरपर्यंत शंभर टक्के लसीकरण करा -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना

Next Post

कलाकार व लेखक यांचे नवसृजन समाजाला समृद्ध करते -राज्यपाल

Next Post
कलाकार व लेखक यांचे नवसृजन समाजाला समृद्ध करते -राज्यपाल

कलाकार व लेखक यांचे नवसृजन समाजाला समृद्ध करते -राज्यपाल

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo