Tuesday, June 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शिक्षाबंदी कै. शरद इंदल परदेशी यांच्या मृत्यूबद्दल आक्षेप नोंदविण्याचे आवाहन-उपविभागीय दंडाधिकारी डॉ. विजयानंद शर्मा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव, (जिमाका) दि. 17- नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षाबंदी असलेले कै. शरद इंदल परदेशी यांचे मयताबाबत आक्षेप असल्यास 20 जुलै, 2021 पावेतो उपविभागीय दंडाधिकारी, उपविभागीय कार्यालय, एकात्मता चौक, कॉलेज रोड, नवीन तहसिल कार्यालय, मालेगांव, जि. नाशिक यांना लेखी स्वरुपात खुलासा कळविण्यात यावा. सदर तारखेपर्यंत खुलासा प्राप्त न झाल्यास पुढील उचित कार्यवाही करण्यात येईल. असे उपविभागीय दंडाधिकारी डॉ. विजयानंद शर्मा यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील शिक्षाबंदी क्रं.सी. 11165 कै. शरद इंदल परदेशी यांस बाल लैगिंक अत्याचार संरक्षण कायदा, 2012 च्या कलम 5 (1), 06, 42 भादंवि, 1860 कलम 376 (2), प्रमाणे अपराधांसाठी स्पे.के.नं. 50/2013 मध्ये दि. 20 मार्च, 2017 रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश-1 व विशेष न्यायाधीश-1 (पोक्सो) जळगाव, जि. जळगाव यांनी 10 वर्षांची शिक्षा सुनावलेली होती. दि. 26 मार्च, 2017 पासुन सदर बंदी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात दाखल झाला होता.

सदर बंदी करागृहातील स्वयंपाकगृह विभागात हाड्यांचे (डाळ बनविण्याचे) काम करीत असतांना दि. 3 जुलै, 2018 रोजी हंडा उचलण्याचे क्रेनमध्ये अचानक विद्युतप्रवाह झाल्याने बंद्यास शॉक लागल्याने स्वयंपाकगृह विभागातील कर्मचारी यांनी बंद्यास इतर बंद्यांच्या सहाय्याने कारागृह रुग्णालयात नेले असता कारागृह वैद्यकीय अधिकारी यांनी दि. 3 जुलै, 2018 रोजी दुपारी 14.25 वाजता मयत घोषित केले. फौजदारी प्रकिया संहिता, 1973 मधील कलम 176 (1) (2) (3) (4) अन्वये कै. शरद इंदल परदेशी यांचे मृत्युबाबतची दंडाधिकारी चौकशी करण्याचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी, नाशिक यांनी उपविभागीय दंडाधिकारी, मालेगांव यांना दिले आहेत.

तरी कै. शरद इंदल परेदशी यांच्या मयताबाबत आक्षेप असल्यास 20 जुलै, 2021 पर्यंत लेखी स्वरुपात कळविण्यात यावा. असे उपविभागीय दंडाधिकारी डॉ. विजयानंद शर्मा यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये आवाहन केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महाराष्ट्रात प्रधानमंत्री पीक विमा योजनेस २३ जुलैपर्यंत मुदतवाढ द्यावी राज्य शासनाने केंद्राकडे पाठविला प्रस्ताव – कृषिमंत्री दादाजी भुसे

Next Post

गाव कृती आराखडा तात्काळ तयार करा-गट विकास अधिकारी श्रीमती स्नेहा कुडचे

Next Post
गाव कृती आराखडा तात्काळ तयार करा-गट विकास अधिकारी श्रीमती स्नेहा कुडचे

गाव कृती आराखडा तात्काळ तयार करा-गट विकास अधिकारी श्रीमती स्नेहा कुडचे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo