Thursday, August 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेची कौतुकाची थाप…

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/12/2024
in राज्य
Reading Time: 1 min read
शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर  बृहन्मुंबई महानगरपालिकेची कौतुकाची थाप…

इयत्ता ५ वीच्या ३१७, तर इयत्ता ८ वीच्या २८८ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव;बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील ६०५ विद्यार्थी झळकले शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत…

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इ.८ वी) परीक्षेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील इयत्ता ५ वीच्या ३१७ आणि इयत्ता ८ वीच्या २८८ विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता (मेरिट लिस्ट) यादीत स्थान मिळविले आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने गौरव करण्यात आला. भायखळा येथील अण्णा भाऊ साठे नाट्यगृह येथे आज (दिनांक १३ डिसेंबर २०२४) हा गौरव सोहळा पार पडला.

उप आयुक्त (शिक्षण) डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर अणि शिक्षण अधिकारी श्री. राजेश कंकाळ यांच्या उपस्थितीत या गुणवंत्त विद्यार्थ्यांचा आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी सर्व उप शिक्षणाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी अणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिनांक १८ फेब्रुवारी २०२४ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील इयत्ता ५ वीच्या ३१७ आणि इयत्ता ८ वीच्या २८८ विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता (मेरिट लिस्ट) यादीत स्थान मिळविले. इयत्ता ५ वीच्या संचिता कांबळे (भरूचा रोड महानगरपालिका मराठी शाळा क्रमांक २) या विद्यार्थीनीने ७६.८७ गुण मिळवून बृहन्मुंबई महानगरपालिका शाळेमधून प्रथम क्रमांक मिळविला. वेदिका सावंत (एल. के. वाघजी एम पी एस शाळा ) या विद्यार्थीनीने ७६.८७ गुणांसह द्वितीय तर शिवम वर्मा (देवनार वसाहत महानगरपालिका शाळा) या विद्यार्थ्याने ७२.१० गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. तसेच इयत्ता ८वीच्या सनिका सिंग (दिंडोशी वसाहत महानगरपालिका हिंदी शाळा क्रमांक १) या विद्यार्थीनीने ६५.७७ गुण मिळवून बृहन्मुंबई महानगरपालिका शाळेमधून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्याचबरोबर रिद्धी कांबळे (विलेपार्ले पूर्व एमपीएस शाळा) हिने ६४.४२ गुणांसह द्वितीय तर रोहित पुखराम बालोटिया (सहकार नगर शताब्दी सोहळा हिंदी शाळा क्र. १) या विद्यार्थ्याने ६४ गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे.

सन २०१६-१७ पासून शिष्यवृत्ती परीक्षेच्या स्वरुपात आमुलाग्र बदल झाले आहेत. परीक्षेचे कामकाज स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर ऑनलाइन पद्धतीने करण्यात येते. विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज भरण्यापासून ते प्रवेश पत्र आणि निकालापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असते. विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिकाही ओएमआर पद्धतीने तपासली जाते. शिष्यवृत्ती परीक्षेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या इयत्ता ५ वीच्या ३१७ व इयत्ता ८ वीच्या २८८ विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळविले आहे.

गुणवत्तेचा आलेख चढता
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इ.८ वी) परीक्षेत सन २०२२ ते सन २०२४ या तीन वर्षांत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा आलेख वाढता आहे. सन २०२२ मध्ये या परीक्षेत इयत्ता ५ वीचे २०२ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी १८४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले. तर सन २०२३ मध्ये ५३७ विद्यार्थ्यांपैकी २८९ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत आपले स्थान पक्के केले होते. तर सन २०२४ मध्ये ८२६ पैकी ३१७ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले.

याप्रमाणेच सन २०२२ मध्ये इयत्ता ८ वीचे १३७ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी १३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. सन २०२३ मध्ये ६६३ पैकी २७८ तर सन २०२४ मध्ये ५७४ पैकी २८८ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत. दरम्यान कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप शिक्षणाधिकारी श्री. अजय वाणी यांनी केले, तर उप शिक्षणाधिकारी श्री. मुख्तार शहा यांनी आभार मानले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जना स्मॉल फायनान्स बँक यांच्यातर्फे शुद्ध पाण्याचे वाटर फिल्टर चे वितरण

Next Post

जमिनीला श्रीमंत करा, ती तुम्हाला श्रीमंत करीन – कृषिभूषण विश्वासराव पाटील जैन इरिगेशन व अंकूर सिडस् तर्फे तूर पीक परिसंवाद व शिवार फेरी

Next Post
जमिनीला श्रीमंत करा, ती तुम्हाला श्रीमंत करीन – कृषिभूषण विश्वासराव पाटील जैन इरिगेशन व अंकूर सिडस् तर्फे तूर पीक परिसंवाद व शिवार फेरी

जमिनीला श्रीमंत करा, ती तुम्हाला श्रीमंत करीन - कृषिभूषण विश्वासराव पाटील जैन इरिगेशन व अंकूर सिडस् तर्फे तूर पीक परिसंवाद व शिवार फेरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo