Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/05/2022
in राज्य
Reading Time: 1 min read


जळगाव, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) : वाघूर धरण विभाग जळगाव कार्यक्षेत्रातील वाघूर डावा कालवा व उजवा कालवा तसेच कालवा उपसा व जलाशय उपसा यावरील प्रकल्पावर जेथे शक्य असेल तेथे कालव्याद्वारे (प्रवाही) तसेच अधिसूचित / अनाधिसूचित लाभक्षेत्रातील नदी, नाला व इतर जलाशयातून उपसा सिंचनाने पाण्याचा उपयोग घेणाऱ्या बागायतदारांनी चालू वर्षी प्रकल्पात उपलब्ध झालेल्या पाणी साठ्यानुसार खरीप हंगामासाठी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.


उप कार्यकारी अभियंता, वाघूर धरण विभाग, जळगाव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय पत्रकात म्हटले आहे, ३० मे ते ३० जून २०२२ या मुदतीत कपाशी, ज्वारी, गहू, हरभरा, बारमाही इतर बारमाही भाजीपाला इतर तेलबिया कडधान्य व भूसार पिके इत्यादी पिकांसाठी पिण्याचे पाण्याचे आरक्षण व्यतिरीक्त उपलब्ध साठ्यातून खालील अटीस अनुसरून पाणी पुरवठा करण्याचे ठरविण्यात आले आहे. खालील अटींच्या पूर्ततेसह नमुना नं. ७ पाणी अर्जावर मागणी करून पाणी अर्ज ३० मे २०२२ चे आत संबंधित वाघूर धरण उपविभाग क्र. १ व २ वराडसिम, वाघुर धरण उपविभाग क्र. ३ व ४ नशिराबाद या कार्यालयात कार्यालयीन वेळेत टपालाने अगर प्रत्यक्ष देण्याचे करावे.


सिंचनाच्या पाणी पुरविण्यासाठी खालील अटी व शर्ती राहतील. त्या अशा : खरीप हंगाम सन २०२२-२३ अखेर संपूर्ण थकबाकी भरणे आवश्यक राहील,पाटमोट संबंध नसावा, प्रत्येक चारीवर सलग क्षेत्रासच मंजुरी दिली जाईल, शेतचारी स्वच्छ व गवत काढलेली असावी. प्रत्यक्ष पास मिळाल्याशिवाय मंजुरी मिळाली असे समजू नये, पाणी अर्जाच्या निर्णय संबंधित उपविभाग, पाटशाखेत,/ ग्रामपंचायत कार्यालय नोटीस बोर्डावर जाहीर करण्यात येईल, मुदतीनंतर आलेल्या पाणी अर्जावर नियमानुसार जादा पाणीपट्टी आकारणी केली जाईल, मंजुर क्षेत्रासच व मंजुर पिकानांच पाणी घ्यावे लागेल, पाणी अर्ज देतांना ७/१२ उतारा किंवा खाते पुस्तिका संबंधित उपविभागास दाखवावी लागेल.
पाटबंधारे अधिनियम (कायदा) १९७६ च्या प्रचलीत धोरणानुसार तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमीत केलेल्या शासन आदेशानुसारच मंजुरी देण्यात येईल. उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त काटकसरीने वापर करून अन्नधान्याचे अधिक उत्पादन वाढवावे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांचे ठोक जलप्रशुल्क निर्धारण आदेश दि. २९ मार्च २०२२ नुसार सुधारीत दराप्रमाणे केलेली आकारणी भरणे बंधनकारक राहील, असेही नमूद करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

केळीवरील कुकुंबर मोझॅक विषाणूपासून काळजी घेण्याचे आवाहन

Next Post

बार्टी मार्फत मोफत उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम

Next Post

बार्टी मार्फत मोफत उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo