Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शेतकऱ्यांनी १४ ऑक्टोबरपर्यंत आपली ई-पीक पाहणी पूर्ण करावी -विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
11/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
शेतकऱ्यांनी १४ ऑक्टोबरपर्यंत आपली ई-पीक पाहणी पूर्ण करावी -विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

नाशिक(विमाका वृत्तसेवा)- शेतकऱ्यांच्या सहभागाने मोबाईल ॲपच्या आधारे शेतकऱ्यांनी स्वत: पीक पेरणीची माहिती स्वतः ऑनलाईन करण्यासाठी ई – पीक पाहणी प्रकल्प १५ ऑगस्ट २०२१ पासून राज्यभरात राबविण्यात येत आहे.

या प्रकल्पाचा शुभारंभ १३ ऑगस्ट २०२१ रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला आहे. यास शेतकऱ्यांनी शासनाने त्यांच्यावर दाखविलेला विश्वास सार्थक करून दाखविला आहे. त्यामुळे या ई-पीक पहाणी प्रकल्पाचे कामकाज १०० टक्के पूर्ण होण्याच्या दृष्टीकोनातून सर्व शेतकऱ्यांनी १४ ऑक्टोबरपर्यंत आपली ई-पीक पाहणी पूर्ण करावी. त्यात काही अडचणी आल्यास आपल्या गावातील तलाठ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले आहे.

क्षेत्रीय स्तरावरून वास्तविक वेळेत पिकांची माहिती संकलित करणे, तसेच सदर माहिती संकलित करतांना पारदर्शकता आणणे, पीक पहाणी प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढविणे, शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या सरकारी योजनांच्या चांगल्या अंमलबजावणीसाठी सदर माहिती वापरणे हे या प्रकल्पाचे उद्दीष्ट आहे. शेतकऱ्यांना देय असणाऱ्या कोणत्याही योजनेचा थेट लाभासाठी ई- पीक पहाणी प्रकल्पातील माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे कोणत्या पिकाखाली किती क्षेत्र आहे याची निश्चित आकडेवारी सहज उपलब्ध होणार आहे.

ठिबक, तुषार सिंचन योजना, आधारभूत किंमतीवर धान, कापूस, हरभरा व तूर खरेदी इत्यादी योजनांसाठी या प्रकल्पातील माहिती उपयुक्त ठरणार आहे. रोजगार हमी योजना उपकर व शिक्षण कर यामुळे निश्चित करता येणार आहे. पीक कर्ज , पीक विमा योजना व कृषीगणना यामुळे अत्यंत सुलभ व अचूकरित्या पूर्ण करता येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त श्री. गमे यांनी दिली.

नाशिक विभागात धुळे जिल्ह्यात ई-पीक पाहणीचे कामकाज हे ६७.४ टक्के इतके झालेले असुन, जळगाव जिल्हयात ई-पीक पाहणी चे कामकाज हे ५९.३० टक्के इतके झालेले आहे. नाशिक जिल्हयात दिंडोरी तालुक्यात ई-पीक पहाणीचे कामकाज हे ९३.५० टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात झालेले आहे. तसेच नाशिक जिल्हयातील कळवण तालुक्यात देखील ई-पीक पाहणी चे कामकाज हे ७४.५६ टक्के इतके झालेले आहे. जळगाव जिल्हयातील पाचोरा तालुक्यात ई-पीक पाहणी चे कामकाज हे ७२.८४टक्के इतके झालेले आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात देखील ई-पीक पाहणीचे कामकाज हे ७१.४३ टक्के इतके झालेले आहे. विभागातील इतरही तालुक्यात शेतकऱ्यांकडून या मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूलमध्ये नवरात्री निमित्ताने जागर स्त्री शक्तीचा कार्यक्रम संपन्न

Next Post

प्रगती गटाच्या अध्यक्ष पदी डॉ. रवींद्र साळुंखे यांची एकमताने निवड; प्रगती गटाची सहविचार सभा उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo