Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शेतातील गव्हाच्या गंज्या पेटवणाऱ्या दृष्ट प्रवृत्तीचा हा भामटा कोण, विरोदे येथील दुसरी घटना

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
शेतातील गव्हाच्या गंज्या पेटवणाऱ्या दृष्ट प्रवृत्तीचा हा भामटा कोण, विरोदे येथील दुसरी घटना

विरोदा(किरण पाटील)- दृष्ट प्रवृत्तीच्या अज्ञात भामट्याने शेतकऱ्यांच्या गव्हाच्या गंज्जीला आग लावून पेटवून दिल्याचा प्रकार विरोदे येथे तिसऱ्या दिवशीही घडल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शेतकरी अर्धा पोटी उपाशी राहून रात्रंदिवस शेतात काबाडकष्ट करीत असतो.रात्रीही शेतात जाऊन पिकांना पाणी देत असतो.ऐन तोंडाची घास आल्यावर मजुरांकडून गव्हाची कापणी करून घेतात. एकत्रित जमा करून दुसऱ्या दिवशी मळणी करून या उद्देशाने गव्हाची गंजी मारून घेत असतो. शेतकरी घरी आल्यावर कोणीतरी अज्ञात दोष प्रकृती असलेला इसम गव्हाच्या गंज्या पेटवून देत असतो. त्यामुळे शेतकरी हा भयभीत झाला आहे. नुकताच दिनांक ४ एप्रिल रोजी रात्री नऊ ते साडे नऊच्या दरम्यान शेतकरी भास्कर कौतिक चौधरी यांचे शेत खेडने गहू पेरण्यासाठी शेतकरी प्रमोद दपाळू चौधरी यांनी अडीच बिघ्यांमध्ये गहू पेरला होता. अज्ञात कोणीतरी भामट्याने आग लावून ३८ ते ४० हजारांचे नुकसान केले होते.चार दिवस होत नाही तोवर दिनांक ७ एप्रिल रोजी शेतकरी ओंकार गणू तायडे यांचे शेत खेडने करणारा प्रकाश भिका बऱ्हाटे  यांचे अडीच बिघ्यातील शेतात गव्हाची गंजी लावलेली होती. विकृत प्रवृत्तीच्या इसमाने पेटवून दिली. त्यामुळे ५५ ते ६० हजारांचे नुकसान झाले आहे. सदरची आग ही पाच ते साडेपाच वाजेच्या सुमारास लावण्यात आली. आग विझवण्यासाठी अमोल वारके या ग्रामस्थाने लागलीच सावदा,फैजपूर नगरपालिकेचा अग्निशामन दलाला काळळवले होते. लागलीच अग्निशामन दल दाखल झाल्याने आग विझवण्यात आली. या शेतकऱ्यांच्या गव्हाच्या गंज्जीला अज्ञात समाजकंटकांनी आग लावून नुकसान केल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.आता न्याय कोणाकडे मागावा असा प्रश्न चिन्ह कायम राहिला आहे. विरोदे ग्रामस्थ शेतकऱ्यांनी शोध घेणे जरुरीचे आहे.अन्यथा ही प्रवृत्ती भामट्याची अशीच वाढत जाऊन अनेक गोरगरीब शेतकऱ्यांच्या गहु व इतर पिकांचे नुकसान होत राहील.म्हणून याकडे पोलीस खात्याने लक्ष देऊन या प्रवृत्तीला आळा घालणे गरजेचे आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोरोना तपासणी लॅब जिल्ह्यात सुरु करा-पालकमंत्र्यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Next Post

सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे पंतप्रधान सहाय्यता निधीला ५१ हजाराची देणगी

Next Post
सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे पंतप्रधान सहाय्यता निधीला ५१ हजाराची देणगी

सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे पंतप्रधान सहाय्यता निधीला ५१ हजाराची देणगी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo