Saturday, August 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान तर्फे वसु बारस निमित्ताने दिव्यांग बांधवांना फराळ वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/11/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान तर्फे वसु बारस निमित्ताने दिव्यांग बांधवांना फराळ वाटप

जळगाव – (प्रतिनिधी) – श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान तर्फे सालाबादा प्रमाणे ह्या वर्षीसुद्धा वसुबारस निमित्ताने शहरातील दिव्यांग बांधवांना फराळ वाटप कार्यक्रम दिनांक ९/११/२०२३ गुरुवार रोजी सायंकाळी ६ वाजता हरिविठ्ठलनगर व्यंकटेश कॉलनी इच्छेवर महादेव मंदिर जळगाव येथे उत्साहात संपन्न झाला.
सदरील कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सौ सुचित्रा ताई महाजन(महिला अत्याचार निर्मूलन सामाजिक कार्यकर्ते जळगाव)सौ सीमाताई परकाळे (मी मराठी प्रतिष्ठान सदस्य जळगाव)सौ सुनिता ताई बाविस्कर(जि. प.विद्यालय पुणगाव) सौ मनीषाताई महाजन(अंगणवाडी सेविका जळगाव)सौ बेबा ताई सुतार(महिला एकता मंडळ अध्यक्ष) जळगांव इतर उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे यांच्याहस्ते गो मातेची आरती व श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन त्यानंतर उपस्थित दिव्यांग बांधवांना फराळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
त्यावेळी सौ सुचित्राताई महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की दिवाळी हा सण हिंदू धर्मियांमध्ये नव्हे तर सर्व धर्मीयांचे लोक मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करीत असतात .
परंतु समाजातील अशा काही व्यक्तींवर निसर्गाने वा समाजाने अन्याय म्हणता येईल असे काही त्यांचे बाबतित घडले असते अशा व्यक्ती प्रति सहानुभूती म्हणून श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठानचे सदस्य सोनाली दाभाडे व त्यांचे प्रतिष्ठान यांनी हा कार्यक्रम आयोजित केला.त्यामुळे त्यांचे मी सर्वप्रथम मनापासून आभार मानते.

कारण स्वत साठी तर सर्व जण जीवन जगत असतात काबाडकष्ट करून झटत असतात परंतु समाजातील झटणार्या व्यक्तींचा हेतू हा उदात्त असतो व त्याचेच हे उदाहरण म्हणावे लागेल .या व्यतिरिक्त उपस्थित स्टेजवरील मान्यवर हेसुद्धा समाजासाठी काम करीत असल्याचे आम्ही मागील दोन वर्षांपासून बघत आहोत.

यावेळी कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा सत्कार सौ सोनाली दाभाडे सौ अर्चनाताई देवरे
सौ बेबाताई मिस्तरी, सौ प्राजक्ता कुमावत सौ आरती दाभाडे, पुष्पगुच्छ देऊन केला.
सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु. धन्वंतरी देवरे हिने केला तर आभार प्रदर्शन श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठानचे सदस्य सौ सोनाली दाभाडे यांनी करुन कार्यक्रमास यशस्वितेसाठी सर्वस्वी
श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठानचे संस्थापक दीपक दाभाडे. दीपक ठाकूर दिनेश खारकर. जितेंद्र दाभाडे. रोहन महाजन यांनी परिश्रम घेतले

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्हा वार्षिक योजनेतील अनुसूचित जाती उपयोजना निधी खर्चात जळगाव जिल्हा राज्यात प्रथम

Next Post

जिल्ह्यात बालविवाह, हुंडा प्रतिबंधक कायद्याची होणार कडक अंमलबजावणी

Next Post
जिल्ह्यात बालविवाह, हुंडा प्रतिबंधक कायद्याची होणार कडक अंमलबजावणी

जिल्ह्यात बालविवाह, हुंडा प्रतिबंधक कायद्याची होणार कडक अंमलबजावणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo