Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

संत मुक्ताबाई राम पालखीचे जैन हिल्स येथे भक्तिभावाने स्वागत;जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केली सपत्नीक पूजा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/06/2025
in जळगाव, विशेष
Reading Time: 1 min read
संत मुक्ताबाई राम पालखीचे जैन हिल्स येथे भक्तिभावाने स्वागत;जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केली सपत्नीक पूजा

जळगाव- (प्रतिनिधी)-जळगाव ते श्रीक्षेत्र पंढरपूर या पवित्र मार्गावर निघालेल्या श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्याचे जैन हिल्स येथे भक्तिपूर्ण वातावरणात हरी नामाचा जयघोष या सोबत टाळ-मृदुंगाच्या निनादात स्वागत करण्यात आले. जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडच्या वतीने १५२ वर्षांची परंपरा असलेल्या वारीचे भक्तिभावाने स्वागत करून आदरातिथ्य केले.

पालखीचे स्वागत व पाद्यपूजा
जैन हिल्सच्या व्हीआयपी गेटजवळ पालखी आगमनानंतर संस्थानचे गाधीपती ह.भ.प. मंगेश जोशी महाराज यांची व श्री संत मुक्ताबाईंच्या पावन पादुकांची पाद्यपूजा जैन इरिगेशनचे अध्यक्ष मा. अशोक जैन व सौ. ज्योती जैन यांनी केली. यावेळी सौ. शोभना अजित जैन व डॉ. भावना अतुल जैन यांनीही भक्तिभावाने पूजनात सहभाग घेतला.

सेवाभाव व श्रद्धेचा संगम
पालखीच्या स्वागतासाठी मानव संसाधन विभागाचे वरिष्ठ अधिकारी पी.एस. नाईक, एस.बी. ठाकरे, जी.आर. पाटील, गांधी रिसर्च फाउंडेशनचे समन्वयक उदय महाजन तसेच मीडिया विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. वारकऱ्यांसाठी विशेष फराळ व अल्पोपहाराची व्यवस्था राजाभोज विभागातर्फे करण्यात आली होती.

पालखीबरोबर सेवा वाहनाची साथ
जैन इरिगेशनतर्फे पालखी सोहळ्यासाठी प्रत्येक वारीला खास सेवा वाहन उपलब्ध करून देण्यात येते ते याही वर्षी देण्यात आले आहे. संपूर्ण वारीदरम्यान या वाहनाचा पालखीबरोबर उपयोग होणार आहे. वाहनाची ही सुविधा वारीतील अवजड वस्तू वाहून नेणे, वृद्ध, महिला व गरजूंच्या मदतीसाठी मोठे उपयुक्त ठरते.

अखंड वारसा आणि ५२ दिवसांचा पायी प्रवास
श्री संत मुक्ताबाई राम पालखी दिंडी सोहळ्यास कान्हदेशचे संत आप्पामहाराज (श्रीराम मंदिर संस्थान, जळगावचे गादीपती आद्य पुरुष) यांनी १८७२ मध्ये सुरूवात केली. तेव्हापासून अखंडपणे ही पालखी दरवर्षी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी जळगाव येथून पंढरपूरकडे मार्गस्थ होते. वारीचा जळगाव ते पंढरपूर आणि पंढरपूर ते जळगाव असा ५२ दिवसांचा, सुमारे ११०० कि.मी.चा पायी प्रवास असतो. वारीमध्ये ‘जय जय रामकृष्ण हरी’ चा गजर, टाळ-मृदुंगाचा निनाद आणि शेकडो वारकऱ्यांचे श्रद्धेने ओथंबलेले पदस्पर्श या साऱ्यांनी वातावरण भारावणारे असते. यावर्षाच्या वारीचे वैशिष्ट्य असे की, वृक्षारोपणाचे महत्त्व त्या त्या गावांना पटवून सांगण्यात येऊन घनदाट सावली देणाऱ्या वृक्षांचे रोपणही करण्यात येणार आहे. या ईश्वरी कार्यास अशोक जैन यांनी शुभेच्छा दिल्या.

जैन हिल्स येथे “कृषी” आणि “ऋषी”चे घडते दर्शन
कंपनीच्यावतीने वारकऱ्यांना दिले गेलेले प्रेम, भक्तिभाव, आदरातिथ्य व सेवा हे संत संस्कृतीच्या सजीव परंपरेचे मनमोहक दर्शन घडवणारे म्हणता येईल. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून श्रद्धेय भवरलालजी जैन अर्थात मोठ्याभाऊंनी हा उपक्रम सुरू केलेला आहे. त्यामागची संकल्पना अशी आहे की, “असी”, “मसी”, “कृषी” आणि “ऋषी” ही चार संकल्पना एकत्र केल्यास, ती संस्कृतीचा एक मोठा भाग दर्शवतात. “असी” आणि “मसी” हे धार्मिक किंवा तत्त्वज्ञानाशी संबंधित शब्द आहेत, तर “कृषी” आणि “ऋषी” शेती आणि ज्ञानाशी संबंधित आहेत. या चारही बाबींचा जैन हिल्स येथे सुरेख संगम झालेला आहे. निसर्गाने फुललेल्या या जैन हिल्स येथे दरवर्षी मनोभावे पंढरीला जाणाऱ्या दिंडीचे भक्तीभावाने जैन परिवार व विस्तारीत जैन परिवारातर्फे स्वागत केले जाते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

समाजकार्य महाविद्यालयाला यूजीसीकडून पुढील दहा वर्षासाठी “स्वायत्त दर्जा”

Next Post

प्रा. डॉ. उमेश वाणी यांची मध्यप्रदेश मधील केंद्रीय अभ्यासमंडळावर नियुक्ती;महाराष्ट्र मध्यप्रदेश सह पाचव्या विद्यापीठात वर्णी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo