Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

संविधान दिनी बरसल्या काव्यधारा!

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
28/11/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
संविधान दिनी बरसल्या काव्यधारा!

जळगांव(प्रतिनिधी)- संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे साजऱ्या झालेल्या कवीसंमेलनातून अनेक कवी कवयित्री आपल्या शब्दमाध्यमातून संविधानाची महती विषद केली.

बांनाई अर्थात डॉ बाबासाहेब आंबेडकर नैशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअरच्या जळगाव शाखेने फुले, शाहू, आंबेडकर साहित्य मंच व समाजकल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने सदरचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगावच्या साहित्य क्षेत्रातील मोठे नाव प्रसिद्ध कवी व लेखक व आकाशवाणीचे माजी कार्यक्रम अधिकारी श्री भगवान भटकर उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे म्हणून श्री अरुण वाणी कार्यलय अधीक्षक समाजकल्याण जळगाव उपअभियंता व्ही के तायडे, सी. डी. तायडे तसेच बानाईचे अध्यक्ष आर. जे. सुरवाडे आदी विराजमान होते. प्रमुख अतिथींच्या अध्यक्षांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून व सामुहिक संविधान प्रस्ताविकांचे वाचन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.

ज्योती राणे यांनी आपल्या मधुर आवाजात गीत गायन करुन प्रमुख अतिथी व सर्व उपस्थितांचे स्वागत केले. केवळ संविधानामुळेच सर्वसामान्यांचे अधिकार हक्क शाबूत आहेत संविधान नसते तर खूप अनर्थ काळा असता अश्या आशयाच्या कविता अनेक प्रसिद्ध कविंनी सादर केल्या यात कवी सुखदेव वाघ, सचिन मौर्य, संतोष साळवे, किशोर नेवे, गोपाळ बागुल, आर. डी. कोळी, अशोक पारधे, निंबा बडगूजर आदी कवींनी उत्तम कविता सादर केल्या तर प्रसिद्ध गायक कवी ईश्वर वाघ यांच्या भीमगीताने तसेच भीमराव सोनवणे यांच्या गेय कवितेने व कवी प्रकाश पाटील यांच्या गायलेल्या कव्वालीने कार्यक्रमाची रंगत वाढवली सुत्रसंचालनाची जबाबदारी प्रसिद्ध निवेदिका ज्योती राणे व गायक कवी ईश्वर वाघ या जोडीने बहरदारपणे पार पडली.

या प्रसंगी शितल शांताराम पाटील, ज्योती वाघ, ज्योती राणे, डाॅ सुषमा तायडे, पुष्पा साळवे, चित्रा भारत पगारे, गंगा सपकाळे, पाठक मॅडम या कवयित्रींनी तेवढ्याच ताकदीच्या व आशय व्यक्त करणारऱ्या कविता सादर केल्या अध्यक्ष कवी भगवान भटकर यांनी घटना तयार करतेवेळी बाबासाहेब यांना कीती यातना झाल्या तो माईसाहेबांच्या भटकरांनी घेतलेल्या मुलाखतीच्या वेळी प्रसंग श्रोत्यांसमोर उभा करताच श्रोत्यांनाही अभिमान वाटला चित्रा पगारे व बी. के. तायडे यांचा सत्कार करण्यात आला.

ज्योती वाघ यांनी आभार प्रदर्शन करुन कार्यक्रमाची सांगता केली या कार्यक्रमासाठी बानाईचे सुशांत मेढे, मनोहर तायडे, बी. के. तायडे, यु. जी. बोदडे, आर. जे. सुरवाडे, अजय निकम तसेच सुखदेव वाघ, ईश्वर वाघ, भिमराव सोनवणे, ज्योती वाघ, ज्योती राणे, चित्रा पगारे,शितल शांताराम पाटील, पाठक मॅडम, गंगा सपकाळे गाढोदेकर यांनी परिश्रम घेतले.

Team Satymev Jayate

Previous Post

इंग्रजीतील संकल्पना अधिक स्पष्ट होण्यासाठी विद्यार्थ्यांना पहिलीपासून दैनंदिन वापरातील शब्द शिकवावेत -शालेय शिक्षणमंत्री

Next Post

‘कुछ नही होता यार’ हे अजिबात चालणार नाही -मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

Next Post
राज्यात विभागनिहाय ‘उद्योग मॅप’ तयार करताना स्थानिकांसाठी रोजगार संधी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

'कुछ नही होता यार' हे अजिबात चालणार नाही -मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo