Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

संशोधक, तंत्रज्ञ सोनम वाँगचूक यांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/02/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
संशोधक, तंत्रज्ञ सोनम वाँगचूक यांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

ही आहे देशभक्ती, हे आहे देशप्रेम; तुमच्या जिद्द आणि समर्पणाला सोनम जी, सलाम – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 22 :- बर्फाच्छादित लडाख सीमेवर तैनात जवानांसाठी थंडीपासून बचाव करणाऱ्या पर्यावरणपूरक तंबूचे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या संशोधक-तंत्रज्ञ सोनम वाँगचूक यांचे मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. वाँगचूक यांच्या प्रयोगाचे ,’ही आहे देशभक्ती, हे आहे देशप्रेम. तुमच्या जिद्द आणि समर्पणाला सोनम जी सलाम!’ अशा शब्दांत कौतुकदेखील केले आहे.

मुख्यमंत्री अभिनंदन संदेशात म्हणतात, “देशाच्या रक्षणासाठी अविचल, निष्ठेने सज्ज जवानांसाठी आपल्या ज्ञानाचा आणि प्रतिभेचा उपयोग व्हावा यासाठी धडपडणे यालाच देशभक्ती, देशप्रेम म्हणतात. बर्फाच्छादित प्रदेश, कडाक्याची थंडी या निसर्गाच्या प्रकोपाला तोंड देतानाच, देशाच्या सीमेवर कुरघोड्या करणाऱ्या शत्रूलाही जरब बसवण्यासाठी आपले जिगरबाज जवान डोळ्यात तेल घालून सतर्क असतात. या जवानांचा आणि पर्यावरणीय समतोल यांचा विचार करून तुम्ही संशोधित केलेल्या सुविधा निश्चितच महत्त्वपूर्ण ठरतील. देशाप्रती तुमची ही बांधिलकी तरूण पिढीसाठी प्रेरणादायी आणि देशाभिमान जागृत करणारी ठरेल असा विश्वास आहे. तुमच्या अशा सर्व प्रयत्न, प्रकल्पांना जरूर पाठबळ देऊ. या शब्दांसह, सोनम जी तुमचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा…जय हिंद!!”

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये ७ मार्चपर्यंत बंद – पालकमंत्री डॉ.नितीन राऊत

Next Post

वीज दर सवलत अर्ज नोंदणीस 28 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

Next Post
वीज दर सवलत अर्ज नोंदणीस 28 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

वीज दर सवलत अर्ज नोंदणीस 28 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo