Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सफाई कर्मचाऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी -राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग सदस्य डॉ.पी.पी.वावा

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
30/09/2021
in विशेष
Reading Time: 1 min read

मुंबई(प्रतिनिधी)- सफाई कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या केंद्र तसेच राज्य शासनाच्या योजनांची प्रभावी अमंलबजावणी करावी, राज्य सफाई कामगार आयोगाची अध्यक्ष तसेच रिक्त पदे तातडीने भरावीत, अशा सूचना राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग, नवी दिल्लीचे सदस्य डॉ.पी.पी.वावा यांनी केल्या.

सफाई कामगारांच्या सामाजिक, आर्थिक समस्या जाणून घेण्यासंदर्भात तसेच शासन अधिनियम 2013 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासंदर्भात राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग नवी दिल्लीचे सदस्य डॉ.पी.पी.वावा महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथे ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत ॲड. सागर चरण, अखिल भारतीय सफाई मजदूर राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष गोविंदभाई परमार उपस्थित होते.

डॉ.पी.पी.वावा म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने रिट पिटीशन क्र ५८३/२००३ मध्ये दिनांक २७ मार्च २०१४ रोजी दिलेल्या निर्णयानुसार सन १९९३ नुसार हाताने मैला साफ करताना दूषित गटारामध्ये मृत्यू पावलेल्या कामगारांच्या कुटुंबातील सदस्यांना रूपये दहा लाखाची नुकसान भरपाई देण्यात येते. ज्या कार्यक्षेत्रात अशा स्परुपाच्या घटना घडल्या आहेत त्या संबधित यंत्रणांनी तात्काळ कार्यवाही करावी कोणत्याही प्रकारचे विलंब न करता ही नुकसान भरपाई संबधित कुटूंबाना देण्यात प्राधान्य देण्यात यावी. राज्यात गटारामध्ये मृत्यू पावलेल्या हाताने मैला साफ करणाऱ्या ३२ सफाई कामगारांपैकी ११ मृत सफाई कामगारांच्या कुटुंबाना नुकसान भरपाई मिळाली असून उर्वरीत प्रकरणातही संबधित यंत्रणांनी गतीमान कार्यवाही करावी.

सफाई कामगारांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेते समाविष्ट करण्यासाठी राज्य शासनाने कार्यवाही करावी. सफाई कर्मचाऱ्यांना घरकुल योजनेतून पक्की घरे देण्यात यावीत. शासन सेवेतील सफाई कामगारांच्या आस्थापना विषयक प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावेत. सफाई कर्मचारी यांच्या समस्या जाणून घेऊन मानवतेच्या दृष्टीकोनातून कार्यवाही करावी, असे निर्देश डॉ.पी.पी.वावा यांनी दिले.

Team Satymev Jayate

Previous Post

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी व पात्र अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी पर्यायी जागेचा शोध घ्यावा -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

‘जागतिक ज्येष्ठ नागरिक’ दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे ‘समृद्ध वृद्धापकाळ’ या विषयावर चर्चासत्र

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo