Wednesday, July 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

समतानगर परिसर सील करण्याच्या महापौरांकडून सूचना!

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन : संपूर्ण परिसर केला निर्जंतुक

जळगाव, दि.२ – शहरातील समता नगर परिसरात राहणारी एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर शनिवारी दुपारी महापौर भारती सोनवणे यांनी त्या ठिकाणी भेट नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन केले. तसेच संबंधित महिलेच्या संपर्कातील लोकांना क्वारंटाइन करून परिसर सील करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

समता नगर परिसरात राहणारी एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर मनपाची आरोग्य यंत्रणा लागलीच कामाला लागली. महापौर भारती सोनवणे देखील त्याठिकाणी पोहचल्या. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, नगरसेवक नितीन बरडे, ज्योती चव्हाण, प्रशांत नाईक, डॉ.राम रावलानी, डॉ.विजय घोलप, डॉ.संजय पाटील यांच्यासह मलेरिया आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

परिसरात केले सॅनिटायझेशन

कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळताच नगरसेवक नितीन बरडे यांनी तात्काळ मनपाच्या यंत्रणेला बोलावून सॅनिटायझेशन प्रक्रिया राबवून घेतली. संपूर्ण परिसरात स्प्रिंकलर मशीन आणि हॅन्ड पंपाद्वारे सॅनिटायझेशन प्रक्रिया राबवून परिसर निर्जंतुक करून घेतला. महापौर भारती सोनवणे यांनी सॅनिटायझेशन प्रक्रियेचा आढावा घेतला.

पोलिसांना बोलावून परिसर सील

समतानगर परिसरात नागरिकांनी घरातच राहावे यासाठी महापौर भारती सोनवणे यांनी आवाहन केले तसेच घाबरून न जाता खबरदारी घेण्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेली महिला राहत असलेल्या घराच्या आजूबाजूचा परिसर सील करण्यासाठी महापौरांनी पोलिसांना पाचारण केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

लॉकडाऊनच्या काळात सायबरचे ३४१ गुन्हे दाखल

Next Post

सावधान! पाकिस्तानी हँकर कडून आरोग्य सेतू अँपच्या माध्यमातून आपली खाजगी माहिती होऊ शकते चोरी

Next Post

सावधान! पाकिस्तानी हँकर कडून आरोग्य सेतू अँपच्या माध्यमातून आपली खाजगी माहिती होऊ शकते चोरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo