Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

समाजकार्य महाविद्यालय एन. एस. एस. चे रोल मॉडेल होवुन पुढे यावे – प्राचार्य डॉ.अतुल साळुंखे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
समाजकार्य महाविद्यालय एन. एस. एस. चे रोल मॉडेल होवुन पुढे यावे – प्राचार्य डॉ.अतुल साळुंखे

जळगांव-(प्रतिनिधी)-दि. २७ सप्टेंबर २०१९ रोजी जळगांव येथील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगांव मधील राष्ट्रीय सेवा योजना विभागातंर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य संपर्क अधिकारी, विशेष कार्य अधिकारी, उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय राष्ट्रीय सेवा योजना कक्ष मुंबई येथील मा. प्राचार्य डॉ. अतुल साळंखे हे प्रमुख व्यक्ते कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय. जी. महाजन , संचालक रासोयो प्रादेशिक संचालनालय बेंगलुरू येथील डॉ. कार्तिकेयन, कबचौ उमवि येथील रासोयो विभागाचे संचालक डॉ. पंकजकुमार नन्नावरे, महाविद्यालयाचे रासोयो कार्यक्रम अधिकारी डॉ. नितीन बडगुजर, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. भारती गायकवाड साह्ययक कार्यक्रम अधिकारी प्रा. निलेश चौधरी, उन्नत भारत अभियानाचे समन्वयक प्रा. जुगल घुगे हे मंचावर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरवात प्रास्ताविकाने डॉ. नितीन बडगुजर यांनी करीत धनाजी नाना चौधरी संस्था महाविद्यालय समाजाकार्य अभ्यासक्रमाची माहिती दिली. प्राचार्य डॉ. अतुल साळुंखे यांनी आपल्या मनोगतात व्यावसायिक समाजकार्याच्या अभ्यासक्रम आणि क्षेत्रकार्यातंर्गत उपक्रमांचे कौतुक करीत राष्ट्रीय सेवा योजनेतुन निर्माण होणारे युवकांचे उदाहरण देत पोपटराव पवार  हे रासोयो चे एकक होते. श्रम संस्कार, शिस्त व अनुशासन, संघटन, राष्ट्रभक्ती या सारख्या विविध पैलु हे विद्यार्थी आत्मसात करतात आणि त्या सोबतच व्यावसायिक समाजकार्याचा विद्यार्थी जर तो असेल तर तो नक्कीच राष्ट्र विकासाचे धैय्य डोळ्यासमोर ठेवुन समाज विकास करण्यासाठी तत्पर असेलच म्हणुन मला आज या महाविद्यालयात येवुन समाजकार्य महाविद्यालय हे एन.एस. एस. चे रोल मॉडेल होवुन पुढे यावे हि मनस्वी ईच्छा मी आज या ठिकाणी प्रकट करतो आणि तुम्हाला सर्वांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो. कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतानां क्षेत्रकार्यांतंर्गत ग्रामिण विकासात  विद्यार्थ्यांच्या उपक्रमांबाबत बोलत असतांना केंद्राचे उन्नत भारत अभियानांर्गत दत्तक गांवा मध्ये झालेल्या कामाची माहिती दिली आणि भविष्यात डॉ. अतुल साळुंखे सर रासोयो मंत्रालय कक्ष मुंबई यांनी काही महत्वपुर्ण जबाबदारी यांनी व्यक्त केलेली भावना भविष्यात नक्कीच पुर्ण होईल हा विश्वास देतो आणि आलेल्या पाहुण्यांनी वेळात वेळ काढुन आमच्या महाविद्यालयाला भेट दिली त्या बद्दल मी आभार मानतो. कोल्हापुर येथील पुरग्रस्तांना कबचौ उमवि जळगांव येथील रासोयो विभागातुन ६८ विद्यार्थ्यांनी २५ घरांचे पुर्नवसन केले या उत्कृष्ठ कामाचा अनुभव मनोगतातुन रासोयो एकक रितेश चौधरी यांनी केले. नुकतेच २४ सप्टेंबर रोजी सुवर्ण मोहोत्सवाची छान रांगोळी रासोयो एकक लिना जगताप , वैष्णवी खैरनार , अर्चना सुर्यवंशी , दिपाली चव्हाण , जयश्री ठाकुर , योगेश वाडेकर , रितेश चौधरी यांनी काढली. आलेल्या पाहुण्यांनी रांगोळी समोर उभे राहुन छायाकंन केले.सुत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन रासोयो एकक लिना जगताप यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. भारती गायकवाड साह्ययक कार्यक्रम अधिकारी प्रा. निलेश चौधरी शिक्षकेतर कर्मचारी राजकुमार पवार यांनी केले परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

स्वच्छता ही सेवा अंतर्गत एरंडोल तालुक्यात प्लास्टिक बंदी मोहीम कडक राबवणार- अर्चना खेतमाळीस

Next Post

तळोदा शहरात मच्छरांचा प्रादुर्भाव वाढल्याने आशिष बारी यांची औषध फवारणीची मागणी

Next Post

तळोदा शहरात मच्छरांचा प्रादुर्भाव वाढल्याने आशिष बारी यांची औषध फवारणीची मागणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo