Saturday, March 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

समाजातील प्रत्येक घटकाला पुढे घेऊन जाण्याची राज्याची परंपरा अबाधित -उपमुख्यमंत्री अजित पवार

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
20/09/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
समाजातील प्रत्येक घटकाला पुढे घेऊन जाण्याची राज्याची परंपरा अबाधित -उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई(प्रतिनिधी)- राज्यातील दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्याला आजवर लाभलेल्या प्रत्येक नेतृत्वाने प्रयत्न केले आहेत. ही परंपरा महाराष्ट्रात यापुढेही अबाधित राहील, जपली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

सह्याद्री अतिथीगृह येथे कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई यांच्या मुलुंड येथील कुणबी विद्यार्थी वसतिगृहाच्या इमारतीसाठी 5 कोटी रुपयांच्या धनादेश वाटपाचा कार्यक्रम झाला.उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार म्हणाले, कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, याची काळजी शासन कटाक्षाने घेते. या वसतिगृह इमारत बांधणी प्रक्रियेत सौर ऊर्जेचा वापर व्हावा, अनावश्यक खर्च टाळावे, आधुनिक तंत्रज्ञानयुक्त पर्यावरणपूरक इमारत बांधण्यात यावी. इमारत बांधणीसाठी काही अडचणी आल्यास त्या दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल, असे श्री. पवार यांनी सांगितले.

खासदार श्री.सुनील तटकरे म्हणाले, कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधणीसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार धनादेश वाटपाचा कार्यक्रम होत आहे. कुणबी समाजासाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे. या वसतिगृहात राहून समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थी विविध क्षेत्रात नक्कीच प्राविण्य मिळवतील असा विश्वासही खासदार श्री. तटकरे यांनी व्यक्त केला.

कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मोठ्या संख्येने वास्तव्यास असलेल्या कुणबी समाजाच्या विद्यार्थ्यांना नोकरीत प्रवेशासाठी मुलाखत, स्पर्धा परीक्षेची तयारी, वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात वाटचाल करण्यासाठी हे वसतिगृह उपयुक्त ठरेल, अशा विद्यार्थी वसतिगृहाची स्थापना कुणबी समाजोन्नती संघ व राज्य शासनाच्या मदत निधीतून होत आहे. याबाबत संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आभार व्यक्त केले.यावेळी श्री.बाबाजी जाधव, कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष भूषण बरे, संदिप रायपूरे व संघाचे पदाधिकारी व सभासद कार्यक्रमास उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

कलापथकांना भांडवली आणि प्रयोगासाठी अनुदान मंजुरीसाठी समिती पुनर्गठित

Next Post

माहिती आधिकार व पत्रकार संरक्षण संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदी श्रीकांत मोरे यांची निवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा

जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d