Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

समिधा नारीशक्ती संघटना व वी कॅन लीड फाउंडेशन मार्फत संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनामुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या महिलांसाठी रोजगार निर्मिती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/09/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
समिधा नारीशक्ती संघटना व वी कॅन लीड फाउंडेशन मार्फत संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनामुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या महिलांसाठी रोजगार निर्मिती

जळगांव(प्रतिनिधी)- भारत हा नवदुर्गेची पूजा करणाऱ्या संस्कृतीतील स्त्रीशक्तीचा देश आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा सहभाग असतो, असे आपण म्हणतो. स्त्री ही फक्त चूल आणि मुलं यात अडकून नं राहता तिने तिचे समाजात एक वेगळे स्वबळावर स्थान निर्माण करावे. स्त्रीमध्ये सहनशीलता, नावीन्यता, सौंदर्याची जाणीव, बचत वृत्ती, संघप्रेरणा, स्मरणशक्ती हे गुण निसर्गतःच अधिक आहेत. स्त्री सृजनशील आहे; कारण निसर्गाने निर्मितीचा अधिकार स्त्रियांना दिला आहे. स्त्री मुळातच सबला आहे. जरी संविधानाने स्त्री व पुरुष यांना समान अधिकार दिले असले तरी भारताच्या पुरुषप्रधान संस्कृतीमुळे स्त्री आज समाज व कुटुंबाच्या बंधनात अडकून पडली आहे. तीन ‘प’ अर्थात पिता, पती आणि पुत्र यांच्या आदेशाने आणि बंधनाने ती आपले आयुष्य काढते आहे. तेव्हा तिला या सर्वातुन बाहेर काढून तिला उद्योग देऊन रोजगार मिळवून आर्थिक दृष्ट्या सशक्त बनविण्याच्या उद्देशाने, कोरोनामुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या महिलांना हातभार लागावा यासाठी महाराष्ट्रभर समिधा नारीशक्ती संघटना व वी कॅन लीड फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने कर्जत-जामखेड मतदार संघांचे आमदार रोहित पवार यांच्या सहकार्याने राधिका पापड उद्योग सुरू केला. त्याचे उद्घाटन सुनंदाताई राजेंद्र पवार व रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समिधा नारीशक्ती संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा दिव्या भोसले, जळगाव  अध्यक्ष करिष्मा भोसले, वी कॅन लीड चे अध्यक्ष सर्वेश मुंढे, युगवीनी देशमुख, योगेश चौधरी, डॉ.नचिकेत पाटील, धनंजय जाधव आदी उपस्थित होते. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

बांबरूड(राणीचे) येथील “बापुश्री फार्म” ला कृषी अधिकाऱ्यांची भेट

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज ७४३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post
जळगाव जिल्ह्यात आज  267 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात आज ७४३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo