Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सरस्वती विद्यामंदिराचा पर्यावरण संवर्धनासाठी अभिनव उपक्रम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/07/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
सरस्वती विद्यामंदिराचा पर्यावरण संवर्धनासाठी अभिनव उपक्रम

जळगांव(प्रतिनिधी)- शहरांची वाढती लोकसंख्या, वाढते नागरीकरण, वाहनांची वाढणारी संख्या, झाडांची तोड आणि जैवविविधतेचा ऱ्हास अशी शहरांपुढे पर्यावरणाची आव्हाने आहेत. एकीकडे हे होत असताना दुसरीकडे याच पर्यावरणातल्या एका घटकाकडून दुसऱ्याकडे आलेल्या एका विषाणूने जगभर थैमान घातलंय. पर्यावरणाचा आणि आपल्या आयुष्याचा किती जवळचा संबंध आहे, हे या जागतिक साथीदरम्यान सगळ्यांच्याच लक्षात आलं. यामुळे  आपण जगत असताना पर्यावरण वाढीवर भर द्यावा हा हेतू ठेऊन शहरातील सरस्वती विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना स्वामी समर्थ ग्रुप संचालिका प्रतीक्षा पाटील, मौलाना आझाद फाऊंडेशन अध्यक्ष फिरोज शेख, चेतन निंबोळकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वसाणे, किशोर घुले, यांच्या हस्ते वृक्ष वाटप करण्यात आले. तसेच वाटलेले रोपे जगवून प्रत्येक वर्षी २३ जुलै ला या रोपाचा वाढदिवस साजरा करून ज्या विद्यार्थ्यांचे रोप जगेल त्यांना शैक्षणिक साहित्य दिले जाणार असल्याचे विद्यार्थ्यांना आश्वासित करण्यात आले. आपण खातो ते अन्न, श्वास घेतो ती हवा, पितो ते पाणी आणि हवामान या सगळ्या गोष्टींमुळे आपण या ग्रहावर राहू शकतो. या सगळ्या गोष्टी निसर्ग आपल्याला देतो आणि सध्याच्या या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये निसर्ग आपल्याला एक संदेश देतोय, स्वतःची काळजी घेण्यासाठी आपण निसर्गाची काळजी घेणं गरजेचं आहे. असा संदेश यावेळी देण्यात आला. सदर उपक्रमाचे आयोजन नियोजन सुवर्णलता अडकमोल यांनी केले तर सविता ठाकरे, मानसी जगताप यांचे सहकार्य लाभले. सदर उपक्रमाचे कौतुक संस्थाध्यक्ष मनोज पाटील यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

नॅशनल युथ कॉन्सिल ऑफ इंडियाच्या भडगाव तालुका पदाधिकाऱ्यांची निवड

Next Post

मुंबईतील कोरोना प्रतिबंधाचे जगाकडून कौतुक; आता आणखी कसोटी, गाफील राहू नका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d