Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

साकुर गावात लोकनाटय तमाशा मंडळाच्या कलावंतांवर झालेल्या हल्याचा व महिला कलावंतांचा विनयभंगाचा जाहिर निषेध

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
साकुर गावात लोकनाटय तमाशा मंडळाच्या कलावंतांवर झालेल्या हल्याचा व महिला कलावंतांचा विनयभंगाचा जाहिर निषेध

आरोपींना कठोर शिक्षा व्हावी याबाबत अ.भा. शाहीर परिषदेचे निवेदन 

जळगाव-(प्रतिनीधी)- महाराष्ट्रातील सांस्कृतिक लोककला जोपासणाऱ्या या तमाशा फडावर व कलावंतांवर सातत्यान गावपातळीवर गावगुंडांकडुन होणारे हल्ले महिला कलावंतांचा विनयभंग अशा अनेक घटना महाराष्ट्रामधे घडत आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या व आपली तमाशा कला लावणी नृत्य कला अशा महाराष्ट्राच्या अस्सल पारंपारिक लोककलेचे जतन संवर्धन करणाऱ्या लोककलावंतांवर होणारे हल्ले गावगुंडांकडुन होणारा त्रास हा अत्यंत घृणास्पद व निंदनीय घटना राज्यामधे घडत आहे. ४ फेब्रुवारी रोजी र्इगतपुरी तालुक्यातील साकुर या गावात सदोबा यात्रेनिमित्‍त कै.तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे यांचा तमाशाचा फड लावण्यात आला होता. तमाशा फडाचा कार्यक्रम शासन नियमाच्या वेळेत संपवुन कलावंत जेवण करायला तंबुत गेले परतले असता व काही कलावंत कार्यक्रमाची आवरा आवर करत असतांना गावातील काही गावगुंड तमाशा फडाच्या तंबुत शिरले व कलावंतांवर प्राणघातक हल्ले केले. तसेच महिला कलावंतांचा विनयभंग करून अश्‍लिल भाषेत शिविगाळ करून कार्यक्रम सुरू करण्याबाबत आग्रह धरला. महाराष्ट्राची सांस्कृतिक अभिरूध्दी जोपासणाऱ्या तमाशा कलावंतासह अनेक लोककलावंतांवर होणारे हल्ले, अत्याचार पुरोगामी महाराष्ट्रासाठी अशोभनीय बाब आहे. असे अखिल भारतीय मराठी शाहीर परिषद, जळगांव व खान्देश तमाशा परिषद, जळगांव यांच्या वतीन या निवेदनाव्दारे मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मा.गृहमंत्री महाराष्ट्र राज्य व मा.सांस्कृतिक कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना विनंती करतो की महाराष्ट्रात होणाऱ्या तमाशा कलावंतांवर होणाऱ्या  हल्ल्याची दखल घेवुन आरोपींना कठोर शासन व्हावे तसेच यात्रेच्या निमित्‍तान तसेच विविध ऊत्सवाच्या निमित्‍तान होणाऱ्या तमाशा कलावंतांना संरक्षण मिळावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.  

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सोयाबीन बियाणांची साठवणूक थंड ओलविरहित व हवेशीर ठिकाणी करावी-कृषी विभागाचे आवाहन

Next Post

सरस्वती विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय रंगभरन स्पर्धेत घवघवीत यश

Next Post
सरस्वती विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय रंगभरन स्पर्धेत घवघवीत यश

सरस्वती विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय रंगभरन स्पर्धेत घवघवीत यश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo