Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत स्वयंसेवी संस्थांच्या अनुदानित वसतिगृहाच्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत स्वयंसेवी संस्थांच्या अनुदानित वसतिगृहाच्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्णय

८ हजार १०४ कर्मचाऱ्यांना मिळणार मानधनवाढीच्या निर्णयाचा थेट लाभ

मुंबई, दि. ९ :- राज्याच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनुदानित वसतिगृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात दि. १ जुलै २०२१ पासून वाढ करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे वसतिगृह अधीक्षकांचे मानधन दहा हजार रुपये, स्वयंपाकींचे मानधन आठ हजार रुपये, मदतनीस आणि चौकीदारांचे मानधन प्रत्येकी साडेसात हजार रुपये होणार आहे. राज्यातील २ हजार ३८८ अनुदानित वसतिगृहात काम करणाऱ्या ८ हजार १०४ कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा थेट  लाभ होणार आहे.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय विभागांतर्गत अनुदानित वसतिगृहांच्या कर्मचाऱ्यांच्या मानधनाच्या प्रश्नासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजीत कदम, नियोजन विभागाचे  अप्पर मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, वित्त विभागाचे  अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक, सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्याम तागडे, सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सामाजिक न्याय विभागांतर्गत राज्यात सुरु असणाऱ्या २ हजार ३८८ अनुदानित वसतिगृहात काम करणाऱ्या अधिक्षक, स्वयंपाकी, मदतनीस आणि चौकीदार अशा

एकूण ८ हजार १०४ कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे राज्यभरातील अनुदानित वसतिगृहात काम करणाऱ्या २ हजार ३८८ अधीक्षकांचे मानधन दहा हजार रुपये, २ हजार ८५८ स्वयंपाकींचे मानधन आठ हजार रुपये, तर ४७० मदतनीसांचे आणि २ हजार ३८८ चौकीदारांचे मानधन प्रत्येकी साडेसात हजार रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी दि. १ जुलै २०२१ पासून करण्यात येणार आहे. या निर्णयाबद्दल सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

…आता कोरोना संसर्ग गाव रोखेल!

Next Post

एस.टी.महामंडळाचे खाजगीकरण त्वरित रद्द करा – राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाची मागणी

Next Post
एस.टी.महामंडळाचे खाजगीकरण त्वरित रद्द करा – राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाची मागणी

एस.टी.महामंडळाचे खाजगीकरण त्वरित रद्द करा - राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाची मागणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo