Friday, June 26, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सामाजिक न्याय विभागाचा कोणताही निधी इतरत्र वळविण्यात आलेला नाही

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/07/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
सामाजिक न्याय विभागाचा कोणताही निधी इतरत्र वळविण्यात आलेला नाही

‘त्या’ पत्रावर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा खुलासा

मुंबई (दि. ११) : इतर मागास बहुजन कल्याण विभागाने ०९ जुलै रोजी काढलेल्या एका पत्रानुसार २०१८ -१९ व २०१९ – २० या वित्तीय वर्षातील अखर्चित निधी २०२० – २१ मध्ये सारथी या संस्थेस खर्च करण्यासाठी परवानगी दिली असून, यासाठी सामाजिक न्याय विभागातील कोणताही निधी वळविण्यात आलेला नसल्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

Maha Info Corona Website

इतर मागास बहुजन कल्याण विभागाने  दि. ०९ जुलै रोजी काढलेल्या पत्रानुसार  सन २०१८ – २०१९ व सन २०१९ – २०२० या वित्तीय वर्षात अखर्चित राहिलेला निधी सन २०२० – २०२१ या वर्षात खर्च करण्याची परवानगी  व्यवस्थापकीय संचालक, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) यांना दिली आहे.

या पत्रावरून काही मंडळींचा सामाजिक न्याय विभागाचा निधी सरकारने इतरत्र वळवल्याबाबत गैरसमज निर्माण झाला आहे, समाजमाध्यमातून या संबंधी काही पोस्ट व्हायरल होऊ लागल्या आहेत.  मात्र अशा प्रकारे कोणताही निधी वळवण्यात आला नसून याबाबत स्वतः धनंजय मुंडे यांनी  आपल्या फेसबुकवर  एक पोस्ट करून सविस्तर खुलासा केला आहे.

सारथी या संस्थेचे नियोजन कसे असावे व त्याची स्थापना करणे हे विषय इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडे हस्तांतरीत होण्यापूर्वी म्हणजेच हे नवीन खाते तयार होण्यापूर्वी सन २०१८ – २०१९ व   सन २०१९ – २० मध्ये सामाजिक न्याय विभागाकडे होते.

त्यावेळी सारथी या संस्थेस आवश्यक असलेल्या निधीची तरतूद ही सर्वसाधारण योजनेतून करण्यात आलेली होती अनुसूचित जातीसाठी असलेल्या अनुसूचित जाती उपयोजनेतुन नव्हे व ती तरतूद त्यांना उपलब्ध केलेली होती व त्यांच्याकडे अखर्चित राहिलेली तरतूद खर्च करण्यास आता हे विषय बहुजन कल्याण विभागाकडे असल्याने त्या विभागाने परवानगी दिलेली आहे.

या बाबींसाठी कुठेही अनुसूचित जाती उपयोजनेच्या किंवा सामाजिक न्याय विभागाच्या कोणत्याही निधीचा वापर करण्यात आलेला नाही.

महा विकास आघाडीचे सरकार सामाजिक न्याय विभागाचा कोणताही निधी इतरत्र खर्च न करता तो विभागाच्‍या योजनांवर शंभर टक्के खर्च करेल अशी ग्वाही मी देतो. याबाबतीत कोणीही गैरसमज निर्माण करू नयेत अशी नम्र विनंती करतो, असेही यावेळी  श्री . मुंडे यांनी म्हटले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शाळेतून पुस्तके गणवेश खरेदी करण्याची सक्ती केल्यास गुन्हे दाखल करा

Next Post

कळंब तालुक्यात कडकडीत बंद ; जनता कर्फ्यूला ग्रामीण भागातही उस्फुर्त प्रतिसाद

Next Post
कळंब तालुक्यात कडकडीत बंद ; जनता कर्फ्यूला ग्रामीण भागातही उस्फुर्त प्रतिसाद

कळंब तालुक्यात कडकडीत बंद ; जनता कर्फ्यूला ग्रामीण भागातही उस्फुर्त प्रतिसाद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo