Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सावदा येथे “आसेम” तर्फे आयोजीत सामूहिक विवाह सोहळ्यात 8 जोडप्याचे शुभमंगल;मान्यवरांची उपस्थिती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/05/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
सावदा येथे “आसेम” तर्फे आयोजीत सामूहिक विवाह सोहळ्यात 8 जोडप्याचे शुभमंगल;मान्यवरांची उपस्थिती

सावदा (प्रतिनिधी) – सावदा येथे दि 29 रोजी येथील नगर पालिकेच्या प्रभाकर बुला महाजन सभागृहात आदिवासी सेवा मंडळ अर्थात “आसेम” या सेवा भावी व सैदैव विविध सामाजीक उपक्रम राबविणाऱ्या या संस्थे तर्फे दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी तडवी समाज बांधवांचा सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी समाजतील 8 जोडप्याचे शुभमंगल संपन्न झाले, संस्थेचे हे सामुहिक विवाह सोहळ्याचे 25 वे रौप्य महोत्सवी वर्ष होते.

यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रावेरचे आ. शिरीषदादा चौधरी, हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मुक्ताईनगरचे आ. चंद्रकांत पाटील तसेच समाजातील विविध मान्यवर उपस्थित होते, यावेळी अध्यक्षस्थनावरून बोलतांना आ. शिरीषदादा चौधरी यांनी आदिवासी तडवी समाज खूप मागासलेला समाज असून त्यास मुख्यप्रवाहात आणणे आवश्यक आहे हे काम समाजातील शिक्षित व उच्च पदावर असलेल्या आपल्याच समाज बांधवांना करावे लागणार आहे या समाज बांधवांनी आपल्या इतर समाज बांधवांना शिक्षित करून पुढे नेण्याची जबाबदारी घ्यावी लागणार आहे त्यासाठी आमची मदत लागल्यास सदैव आपण तत्पर असल्याचे सांगितले, तर प्रमुख पाहुणे आ. चंद्रकांत पाटील यांनी देखील समाजाचे उन्नती साठी प्रगती साठी आपण केव्हाही आवाज द्या आपण हजर असल्याचे सांगितले तसेच अश्या समाज उपयोगी कार्यक्रमाची नितांत आवश्यकता असल्याचे देखील सांगितले, तर सावदा येथील माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक राजेश वानखेडे यांनी आपण या सामूहिक विवाह सोहळ्याचे 25 वर्षा पासून साक्षीदार आहोत प्रत्येक वेळी समाजाने जेव्हा आवाज दिला तेव्हा आपण साथ दिली असल्याचे सांगत यापुढे देखील समाज साठी प्रत्येक कार्यात समाज सोबत उभे राहू असे सांगितले आसेमचे अध्यक्ष राजू तडवी गुरुजी यांनी समजा साठी केलेले हे कार्य खरोखर उल्लेखनीय असल्याचे सांगत त्यांचा गौरव केला.

यावेळी कार्यक्रमास कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार शिरीष दादा चौधरी, प्रमुख उपस्थिती आमदार चंद्रकांत पाटील मुक्ताईनगर, मुक्ताईनगर नगराध्यक्ष नजमा तडवी, माजी नगराध्यक्ष यावल नौशद तडवी, आसेम राज्य अध्यक्ष नजमा तडवी, आसेम जिल्हा अध्यक्ष अलिशान तडवी, सावदा येथील माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक राजेश वानखेडे, माजी नगरसेवक फिरोज पठाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे रावेर तालुका कार्याध्यक्ष विलास ताठे रावेर ,पत्रकार दिपक श्रावगे, आदिवासी प्रकल्प सेवा समिती सदस्य मासूम रेहमान तडवी, माजी सेल्स टॅक्स उपायुक्त नासीर तडवी, सूरज परदेशी,
कामील शेठ, गनी तडवीसर, संजय जमादार,दिलरुबाब तडवी, लियाकत जमादार, अल्लादिन तडवी उपसरपंच सावखेडा, छोटू तडवी चिंचाटी,सह अनेक मान्यवर मंडळी व्यासपीठावर उपस्थित होते. तर सुत्रसंचालन राजू तडवी सर यांनी केले, यावेळी सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न लागलेल्या प्रत्येक जोडप्यास संसार उपयोगी साहित्याचे वाटप देखील मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमात मातोश्री आनंदाश्रमाचा सहभाग

Next Post

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त 31 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार जिल्हा व राज्यस्तरावरील निवडक लाभार्थ्यांशी संवाद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo