Wednesday, March 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सुप्रमानां मान्यता देऊन योजनांना निधीची उपलब्धता करून देणार रोहिणी खडसे खेवलकर यांना जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांचे आश्वासन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/08/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
सुप्रमानां मान्यता देऊन योजनांना निधीची उपलब्धता करून देणार रोहिणी खडसे खेवलकर यांना जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांचे आश्वासन

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील उपसा सिंचन योजनांची आढावा बैठक संपन्न


मुंबई (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांनी दि १२ ऑगस्ट रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील यांचेकडे मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील बोदवड परिसर उपसा सिंचन योजना, कुऱ्हा वढोदा इस्लामपुर उपसा सिंचन योजना, मुक्ताई उपसा सिंचन योजना, वरणगाव तळवेल उपसा सिंचन योजना या अपुर्ण अवस्थेत असलेल्या उपसा सिंचन योजनांची आढावा बैठक घेऊन निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली होती

त्यानुसार जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या मंत्रालय येथील दालनात आज दि २० ऑगस्ट रोजी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील उपसा सिंचन योजनांची आढावा बैठक जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीत जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी ताई खडसे खेवलकर, ता ना मुंडे सचिव जलसंपदा विभाग, विजय गौतम विशेष कार्य अधिकारी जलसंपदा मंत्री, अ प्र कोहीकर सचिव, डी डी तवार कार्यकारी संचालक तापी महामंडळ, वाय एम कडलग कार्यकारी अभियंता तापी महामंडळ,निवृत्ती पाटील सभापती बोदवड बाजार समिती,सुभाष पाटील माजी जि प सदस्य,रामभाऊ पाटील माफदा मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष ,विशाल महाराज खोले जिल्हा संयोजक प्रवक्ता सेल जळगाव जिल्हा, रविंद्र पाटील उपसरपंच हिवरा हे उपस्थित होते तर जळगाव येथुन व्हिडीओ कॉन्फरस द्वारे प्रशांत मोरे अधीक्षक अभियंता ,गोकुळ महाजन कार्यकारी अभियंता, अदिती कुलकर्णी कार्यकारी अभियंता हे उपस्थित होते

पूर्णा तापी नदीचे पुराद्वारे वाहून जाणारे पाणी लिफ्ट इरगेश द्वारे उपसुन मुक्ताईनगर बोदवड कुऱ्हा परिसरातील शेतीला देऊन शेतीचे कोरडवाहू क्षेत्र बागायती खाली येण्यासाठी एकनाथ खडसे हे जलसंपदामंत्री असताना त्यांनी मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात तापी खोरे विकास महामंडळाअंतर्गत बोदवड उपसा सिंचन योजना, कुऱ्हा वढोदा इस्लामपुर उपसा सिंचन योजना, मुक्ताई उपसा सिंचन योजना, वरणगाव तळवेल उपसा सिंचन योजनाची मुहूर्तमेढ रोवली या योजनांचे काम सुरु आहे. या उपसा सिंचन योजनांच्या आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा आज जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी घेतला

यावेळी मुक्ताई उपसा सिंचन योजनेचे ८० टक्के काम पूर्ण झाले असुन उर्वरित कामासाठी आवश्यक असलेल्या ५५ कोटी रुपये निधीचा सुधारीत प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव मंजुरी साठी शासनाकडे गेलेला आहे त्यावर जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी प्रस्तावावर तत्काळ निर्णय घेण्यात येईल व निधीची उपलब्धता करून देण्यात येईल असे सांगितले

मुक्ताईनगर तालुक्यातील जोंधनखेडा गावाजवळ गोरक्षगंगा नदीवर असलेल्या कुंड धरणाचे काम पूर्ण झाले आहे परंतु धरणाच्या भिंतीची उंची वाढविणे व सांडव्याचे काही काम अपूर्ण राहिले आहे यावर धरणाच्या भिंतीची ३ मीटर ने उंची वाढविणे व सांडव्याचे अपूर्ण असलेले काम पूर्ण करण्यासाठी सुमारे 19 कोटी रुपये निधीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात येईल असे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी सांगितले. वरणगाव तळवेल उपसा सिंचन योजनेचे काम जवळपास पुर्ण झाले आहे त्याद्वारे हतनुरचे वाहून जाणारे पाणी ओझरखेडा धरणात टाकण्यात येते परंतु हि योजना काही तांत्रिक अडचणीमुळे बंद अवस्थेत आहे . त्यामुळे योजनेच्या विद्युत पुरवठा व पाणी उपसा करणारे पंपामध्ये बिघाड निर्माण झाला आहे.

त्यावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी संबंधित अधिकारी यांना पावसाळ्यापूर्वी दरवर्षी योजनेची तांत्रिक चाचणी घेण्यात यावी असे सक्त निर्देश दिले व आता लवकरात लवकर विद्युत पुरवठ्याचे व पंपाचे काम करून ओझरखेडा तलावात पाणी सोडण्याचे आदेश दिले तसेच या योजनेचे अपूर्ण असलेले पाणी वितरिकेचे काम करण्यासाठी प्रस्तावाला मंजुरी देण्यात येईल व वितरिकेच्या कामांची निविदा काढण्यात येईल असे सांगितले

बोदवड परिसरासाठी वरदान ठरणाऱ्या बोदवड उपसा सिंचन योजनेच्या आतापर्यंत झालेल्या कामांचा आढावा घेण्यात आला बोदवड उपसा सिंचन योजनेसाठी केंद्र शासनाच्या मार्फत ५०० कोटी मंजूर झाले आहेत यातील ६० कोटी रुपये निधी मिळाला असुन उर्वरित ४३३ कोटी रुपये निधी मिळण्यासाठी संबंधित अधिकारी यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी दिले. कुऱ्हा वढोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजनेचे अपुर्ण असलेल्या कामासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी अहवाल सादर करण्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी संबंधित अधिकारी वर्गाला निर्देश दिले

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

आ.किशोर आप्पा पाटील यांच्या कडुन जेष्ठ शिक्षक बी एन पाटील (पत्रकार) यांचा सत्कार

Next Post

जलजीवन मिशन मधून नळजोडणी लवकर करा

Next Post

जलजीवन मिशन मधून नळजोडणी लवकर करा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d