Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सेवा प्रवेश नियमानुसार टंकलेखन प्रमाणपत्र आवश्यक असलेल्या परीक्षांकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी लागू

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
17/11/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
सेवा प्रवेश नियमानुसार टंकलेखन प्रमाणपत्र आवश्यक असलेल्या परीक्षांकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी लागू

मुंबई(प्रतिनिधी)- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित लिपिक-टंकलेखक (मराठी), लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) तसेच कर सहायक या टंकलेखन अर्हता आवश्यक असलेल्या दोन संवर्गाच्या परीक्षांकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी (Typing Skill Test) लागू करण्याची बाब आयोगाच्या विचाराधीन होती.

यासंदर्भात संबंधित संवर्गाच्या सेवाप्रवेश नियमातील तरतुदी व इतर बाबींचा साकल्याने विचार करुन आयोगाकडून पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.

(१) लिपिक-टंकलेखक (मराठी), लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) तसेच कर सहायक या तीन संवर्गातील पदभरतीकरीता संगणक प्रणालीवर आधारित स्वतंत्र टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येईल.(२) टंकलेखन कौशल्य चाचणी ही केवळ अर्हताकारी/पात्रता (Qualifying) स्वरुपाची असेल.(३) लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे संबंधित संवर्गाच्या भरावयाच्या पदांच्या तीनपट उमेदवार टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र ठरविण्यात येतील.(४) लिपिक-टंकलेखक (मराठी), लिपिक-टंकलेखन (इंग्रजी) व कर सहायक संवर्गाकरीता स्वतंत्रपणे टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येतील. कर सहायक संवर्गाकरीता मराठी व इंग्रजी या दोन्ही चाचणीमध्ये अर्हताकारी/पात्र (Qualifying) ठरणे आवश्यक असेल.

Team Satymev Jayate

Previous Post

माझी वसुंधरा अभियानाच्या यशस्वीतेसाठी लोकसहभाग वाढवा

Next Post

आयटीआयमधील मुलींना मिळणार नाविन्यपूर्ण कौशल्य प्रशिक्षण

Next Post
आयटीआयमधील मुलींना मिळणार नाविन्यपूर्ण कौशल्य प्रशिक्षण

आयटीआयमधील मुलींना मिळणार नाविन्यपूर्ण कौशल्य प्रशिक्षण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo