Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सेवा साधना अनुष्ठान शिबिरात कळणार संस्कारांचे महत्व!

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/02/2020
in विशेष
Reading Time: 2 mins read
सेवा साधना अनुष्ठान शिबिरात कळणार संस्कारांचे महत्व!

श्री योग वेदांत सेवा संस्थानतर्फे आयोजन : हजारो साधकांचा असणार सहभाग

जळगाव – सध्या जग वेगाने बदलत असून विज्ञान झपाट्याने प्रगती करत आहे. जग पुढे जात असले तरी मनुष्य आपले संस्कार विसरत चालला आहे. संस्कारांचा विसर पडल्याने पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण वाढू लागले आहे. पूज्य आसाराम बापू नेहमी संस्कारांना आणि भारतीय संस्कृतीला प्राधान्य देतात. त्यांनी वेलेन्टाइन डे ऐवजी मातृपितृ पूजन दिवस सुरू केला. मातृपितृ पूजन दिनाचे औचित्य साधत श्री योग वेदांत सेवा संस्थानतर्फे दोन दिवसीय सेवा साधना अनुष्ठान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत गणेश चौधरी यांनी दिली.

पूज्य आसाराम बापू आश्रम निवृत्तीनगर येथे घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेला अनिल चौधरी, राजेश म्हस्के, ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह साधक श्री योग वेदांत सेवा संस्थानचे पदाधिकारी उपस्थीत होते.

दोन दिवसीय सेवा साधना अनुष्ठान शिबीर

संस्थानतर्फे जिल्हाभरातील साधकांसाठी दि.१५, १६ फेब्रुवारी रोजी जळगावी निवासी सेवा साधना अनुष्ठान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरासाठी आजवर ७०० पेक्षा अधिक साधकांनी नोंदणी केली असून हजारावर साधक सहभागी होतील असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे. शिबिरात योग साधना, प्राणायाम, ध्यान साधना आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच साधकांना नट मिल्क आणि ग्रीन ज्यूस देखील देण्यात येणार आहे. 

मातृपितृ पूजन दिवस हाच खरा प्रेम दिवस

वेलेन्टाईन दिवस हा पाश्चात्य संस्कृतीचे प्रदर्शन करणारा दिवस आहे. पूज्य आसाराम बापू यांनी दि.१४ फेब्रुवारी हा मातृपितृ पूजन दिवस साजरा करण्यास सुरुवात केली होती. यावर्षी देखील जळगावातील आश्रमात हजारो साधकांच्या उपस्थितीत वृद्धाश्रमातील वृद्धांना बोलावून त्यांचे पूजन करण्यात येईल. पाल्यांकडून न मिळालेल्या प्रेमाची त्यांना जाणीव न होवू देण्यासाठी दिवसभर त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील. तसेच प्रेमाचा खरा अर्थ इतरांना कळावा यासाठी त्या दिवसाचे महत्व तरुणाईला पटवून देण्यात येणार आहे.

पर्यावरण शुद्धीकरण सामुहिक यज्ञ

भारतीय संस्कृतीमध्ये पर्यावरणाला मोठे महत्व आहे. सध्या पर्यावरणाचा मोठ्याप्रमाणात ह्रास होत आहे. पर्यावरण संवर्धनासाठी आश्रमात सामूहिक पर्यावरण शुद्धीकरण यज्ञ आणि वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

स्वस्थ राहण्यासाठी अनमोल मार्गदर्शन

अलीकडच्या काळात मनुष्य जीवनात मोठमोठे रोग वाढताय. पूर्वी वयाच्या साठीनंतर होणारे आजार आज तारुण्यात बळावताय. आपल्या जीवनात काय चुका होताय, जीवनशैलीत काय बदल करायला हवे. रोग कसे रोखता येतील याविषयी डॉ.अतुल नारखेडे यांचे प्राकृतिक चिकित्सा, जीवनशैलीत बदल करून स्वस्थ राहण्याचा मूलमंत्र याविषयी अनमोल मार्गदर्शन साधकांना शिबिरात मिळणार आहे.

लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव शहरात होत असलेल्या या भव्य निवासी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन साधक श्री योग वेदांत सेवा संस्थानतर्फे करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आज आमच्या लग्नाचा वाढदिवस…

Next Post

Kce’s IMR ला व्यवस्थापन शास्त्रातील सर्वोत्तम मान्यता पुरस्कार

Next Post

Kce's IMR ला व्यवस्थापन शास्त्रातील सर्वोत्तम मान्यता पुरस्कार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo