Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सॉफ्ट बॉल बोगस प्रमाणपत्राची शाळा पोलिसांच्या दारी फारुक शेख यांनी केली तक्रार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/03/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
सॉफ्ट बॉल बोगस प्रमाणपत्राची शाळा पोलिसांच्या दारी फारुक शेख यांनी केली तक्रार

माननीय अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांना तक्रारीची प्रत सादर करताना फारुक शेख

मागील काही दिवसापासून तलवारबाजी सॉफ्टबॉल व इतर काही खेळातील बोगस प्रमाणपत्र मुळे जळगाव जिल्ह्याचे नाव क्रीडा क्षेत्रात व पोलीस विभागात बदनाम होत असल्याने जळगाव जिल्हा फूटबॉल असोसिएशनचे सचिव तथा विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी फारुक शेख अब्दुल्ला यांनी शुक्रवार रोजी जळगाव अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना सविस्तर अशी तीन पाणी तक्रार जिल्हा पेठ पोलीस स्टेशन जळगाव यांचे नावे दाखल केली असता पोलीस अधीक्षक यांनी त्वरित पोलीस निरीक्षक जिल्हापेठ यांना चौकशीचे आदेश दिले

तक्रारीचा सारांश

महाराष्ट्र सॉफ्टबॉल संघटनेचे अध्यक्ष जळगाव चे लोकप्रिय आमदार गिरीश महाजन साहेब व सचिव डॉक्टर प्रदीप तळवलकर हे आहेत डॉक्टर तळवलकर यांनी क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे यांना १२ फेब्रुवारी रोजी २१ रोजी लेखी पत्र देऊन ८० खेळाडूंच्या व्हेरिफिकेशन मधून ३० खेळाडू हे पूर्णपणे बोगस असल्याचे लेखी अहवाल सादर केलेला आहे.

या ३० बोगस खेळाडू पैकी काहींना शासकीय नोकऱ्या मिळालेल्या आहेत. बोगस प्रमाणपत्र देणारे घेणारे व प्रमाणपत्राला व्हेरिफाय करणारे अधिकारीवर्ग यांच्या नाकर्तेपणा मुळे गुणी खेळाडूंचा नुकसान होत असून त्यांच्या या बोगसगिरी मुळे संपूर्ण क्रीडा क्षेत्र बदनाम होत असताना व डॉ तळवलकर यांच्या बोगस सह्या केलेल्या असतांना सुद्धा डॉ तळवलकर हे पोलीस गुन्हा दाखल करत नसल्याने फारुक शेख यांनी स्वतः पुढाकार घेऊन लेखी तक्रार दाखल केली.

भा द वी प्रमाणे कारवाई करा
भारतीय दंड विधान कायदा मधील बोगस प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नोकरी अधिक अधिग्रहीत करणारे गुन्हेगार यांच्यावर व सर्व संबंधितांवर शासनाची दिशाभूल करून खोटे पुरावे देऊन, खोटे प्रमाणपत्र देणे किंवा स्वाक्षरीत करणे हा गुन्हा असताना त्यांनी जे अधिकथन विधित पुरावा म्हणून स्वीकार्य आहे, त्यात केलेले खोटे कथन माहित असून सुद्धा खरे म्हणून वापरलेले आहे ,खोटे दस्तऐवज बनविले, बनावटी करण केले, ठकवणूक करण्यासाठी बनावटी करण केले ते बनावट दस्तऐवज खरे म्हणून वापरले आहे म्हणून या सर्वांच्या विरुद्ध गुन्हा दाखल होऊन चौकशीची मागणी केलेली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

युवकांनो, स्वतःचे नेतृत्वगुण जोपासायला शिका : महापौर जयश्री महाजन

Next Post

जळगाव पीपल्स बँक रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्ट, राजेश्री श्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटलची नवीन उपलब्धी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo