Friday, August 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्टार्ट-अप वीक 2022  ज्या इच्छुकांना सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी खाली दिलेल्या संकेतस्थळावर 30 मे पर्यंत नोंदणी करावी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/05/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव, दि.18 (जिमाका वृत्तसेवा) : – राज्याच्या औदयोगिक तसेच आर्थिक विकासास चालना देण्यासाठी आणि बेरोजगाराच्या समस्येवर उपायोजना करण्यासाठी   नाविन्यपूर्ण संकल्पनावर आधारीत उदयोगांना प्रोत्साहन देणे, नियामक आराखडा तयार करुन स्टार्ट-अप इको सिस्टीम ला चालना देण्यासाठी महाराष्ट्र स्टेट इनोव्हेंटिव्ह स्टार्ट अप पॉलीसी-2018 कौशल्य विकास व उदयोजकता विभाग शासन निर्णय क्र. कौविउ-2017/प्रक्र 243/अभियान-1 दि. 5 फेब्रुवारी, 2018 च्या शासन निर्णयाव्दारे मान्यता देण्यांत आलेली आहे.

          या अनुशंगाने महाराष्ट्र स्टार्ट –अप सप्ताह हा राज्याच्या उदयोजकीय परिसंस्थेला प्रोत्साहन आणि सक्षम करण्याचा प्रयत्न करीत असतो. याअंतर्गत शिक्षण, कौशल्य, आरोग्यसेवा, कृषी, स्वच्छ उर्जा, पर्यावरण, पाणी आणि कचरा व्यवस्थापन, स्मार्ट पायाभूत सुविधा आणि गतिशिलता प्रशासन व विविध क्षेत्रातील स्टार्ट-अप यांना त्यांचे अर्ज सादर करण्यासाठी आमंत्रित केले जाते.  यात भाग घेणाऱ्या स्टार्ट-अप  मधून 100 स्टार्ट-अपची तज्ञ पॅनेलव्दारे निवड केली जाते. आणि त्यानंतर आठवडाभर चालणाऱ्या स्टार्ट-अप  विक कार्यक्रमा दरम्यान सर्वोकृष्ट 24 स्टार्ट-अपची विजेते म्हणून निवड केली जाते आणि विजेत्या स्टार्ट-अप  यांना रु. 15 लाखापर्यंत शासकीय कार्यादेश ( वर्क ऑर्डर ) दिल्या जातात.

          याचाच एक भाग म्हणून 5 वा महाराष्ट्र स्टार्ट-अप वीक 2022 घोषीत करण्यात आला असून, ज्या इच्छुकांना (स्टार्ट-अप) मध्ये  सहभागी व्हावयाचे आहे त्यांनी दि.30 मे, 2022 पर्यंत खालील दिलेल्या संकेतस्थळावर नोंदणी करावी असे आवाहन सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शक केंद्र, वि.जा. मुकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

संकेतस्थळ :- www.msins.in

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

खोटे नगरच्या फर्निचर दुकानाला लागलेल्या आगीवर नियंत्रण

Next Post

आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र 31 मे पर्यंत ऑनलाईन भरण्याचे आवाहन

Next Post

आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र 31 मे पर्यंत ऑनलाईन भरण्याचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo