Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्थानिकांसाठी पाणी आरक्षित करून सिंचनासाठी पाण्याचे नियोजन करावे – पालकमंत्री छगन भुजबळ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/01/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
स्थानिकांसाठी पाणी आरक्षित करून सिंचनासाठी पाण्याचे नियोजन करावे – पालकमंत्री छगन भुजबळ

कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न

नाशिक, दिनांक 8 जानेवार, 2022(जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यातील ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पातील गंगापुर,कडवा,पालखेड व ओझरखेड आणि चणकापुर प्रकल्पांमधून सिंचनासाठी पाण्याचे नियोजन करतांना स्थानिकांच्या पिण्याचे पाणी आरक्षित करून नियोजन करावे असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात जिल्ह्यातील मोठे प्रकल्पांचे 2021-2022 करिता सिंचनाचे नियोजन करणेकामी कालवा सल्लागार समितीच्या आयोजित बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. याबैठकीला कृषी मंत्री दादाजी भुसे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार डॉ. सुधीर तांबे, नरेंद्र दराडे, किशोर दराडे, ॲड. माणिकराव कोकाटे, दिलीपराव बनकर,प्रा.देवयानी फरांदे,सुहास कांदे, नितीन पवार, दिलीप बोरसे, हिरामण खोसकर, सरोज अहिरे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिक्षक अभियंता व प्रशासक अलका अहिरराव, कार्यकारी अभियंता सागर शिंदे,राजेंद्र गोवर्धने यांच्यासह इतर पदाधिकारी व संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की,  मोठ्या प्रकल्पांमधील 2021-2022 करिता सिंचनाच्या पाण्याचे नियोजन करतांना धरण साठ्यात उपलब्ध असणाऱ्या पाणीसाठ्यानुसार स्थानिक नागरिकांना 20 ते 25 टक्के पाणी आरक्षित असावे. यासाठी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण विभागाने शासनाकडे प्रस्ताव सादर केल्यास स्थानिक नागरिकांच्या पाणी आरक्षणाबाबतचा प्रश्न मार्गी लागणार असून सर्वांना समान न्याय देता येणार आहे.  याबरोबरच रब्बी हंगामाचा विचार करून ज्या भागात पाण्याची आवश्यकता जास्त आहे.

त्या ठिकाणी शेतीला पाणी देण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे, अशा सुचनाही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी संबंधित विभागाला दिल्या आहे.

याबरोबरच गंगापुर प्रकल्पाच्या नाशिक डावा तट कालव्यातुन सिंचन व बिगर सिंचनासाठी रब्बी व उन्हाळा हंगामात प्रत्येकी तीन आवर्तने, कडवा प्रकल्पाच्या उजवा कालव्यातुन सिंचन व बिगर सिंचनासाठी एक, उर्ध्व गोदावरी प्रकल्प पालखेड डाव्या तट कालव्यातुन सिंचनासाठी रब्बी हंगामात दोन आवर्तने व बिगर सिंचनासाठी उन्हाळा हंगामात दोन आवर्तने तसेच पालखेड उजव्या तट कालव्यातुन सिंचन व बिगर सिंचनासाठी रब्बी व उन्हाळी हंगामात प्रत्येकी तीन आवर्तने सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

उर्ध्व गोदावरी प्रकल्प ओझरखेड प्रकल्प यामध्ये ओझरखेड व तिसगाव कालव्यातुन सिंचनासाठी रब्बी हंगामात दोन व उन्हाळा हंगामात बिगर सिंचनासाठी एक आवर्तन सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. चणकापुर प्रकल्प कालव्यातुन सिंचन व बिगर सिंचनासाठी रब्बी हंगामात एक व उन्हाळा हंगामात मर्यादीत क्षेत्रासाठी एक आवर्तन देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले आहे.

जिल्ह्यातील गिरणा धरण प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाण्याचे आवर्तन सोडण्यासाठी योग्य नियोजन केले तर त्या धरणालगत असणाऱ्या एकुण सात गावांना या पाण्याचा फायदा होणार आहे. यासाठी पाण्याचे नियोजन करतांना पिण्याचे पाणी व या क्षेत्रात असणाऱ्या एमआयडीसी साठी लागणारे पाण्याचे योग्य नियोजन आवश्यक आहे. तसेच तळवाडे व दाभाडी या गावांसाठी स्वतंत्र्य पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षणाचे नियोजन करण्यात यावे अशा सुचना कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी संबंधित विभागाला यावेळी दिल्या आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

वर्ष 2022-23 साठी 807.86 कोटी नियतव्यय प्रस्तावित; जिल्ह्यातील विकास थांबला नाही थांबणारही नाही – पालकमंत्री छगन भुजबळ

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज ८७ नवे बाधित रुग्ण, वाचा तुमच्या तालुक्यातील आकडेवारी

Next Post
राज्यात कोरोनाच्या ३६ हजार ४ रुणांवर उपचार सुरु

जळगाव जिल्ह्यात आज ८७ नवे बाधित रुग्ण, वाचा तुमच्या तालुक्यातील आकडेवारी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d