Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्मरणशक्ती विकासासाठी एसडी-सीडचा उपक्रम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/02/2020
in शैक्षणिक
Reading Time: 2 mins read

कोणत्याही क्षेत्रात उत्तम यश मिळविण्यासाठी कुशाग्र बुद्धिमतेला पर्याय नाही – श्री. अभिजित कुलकर्णी

जळगाव: विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी वेगवेगळी असल्याने विद्यार्थ्यांना जर शैक्षणिक प्रगती साधायची असेल तर त्यांच्या जवळ प्रखर स्मरणशक्ती व एकाग्रता मोठ्या प्रमाणात असणे गरजेचे आहे. त्या अनुसरून विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती व एकाग्रता वाढावी, त्यांचे महत्व त्यांना कळावे या उद्देशाने एसडी-सीड तर्फे “स्मरणशक्ती व एकाग्रता विकास” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन प्रेमाबाई जैन माध्यमिक विद्यालय, जळगाव  येथे करण्यात आले. मार्गदर्शक म्हणून श्री .अभिजित कुलकर्णी   हे होते.

कार्यक्रमाला मुख्याध्यापक श्री. गजानन सूर्यवंशी, एसडी-सीड असोसिएट प्रवीण सोनवणे, सौ. अर्चना धांडे, सौ. धनश्री फिरके, सौ. मीना नारखेडे तसेच सर्व विद्यार्थी  उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रुपाली वानखेडे यांनी केले तर आभार सौ. मोहिनी चौधरी यांनी मानले.

शक्ती पेक्षा बुद्धी श्रेष्ठ ही म्हण आज पण शंभर टक्के खरी आहे. कोणत्याही क्षेत्रात उत्तम यश मिळविण्यासाठी कुशाग्र बुद्धिमतेला पर्याय नाही. ह्या बद्दल कोणाचे दुमत असणे शक्य नाही असा मोलाचे प्रतिपादन कुलकर्णी  यांनी कार्यक्रमप्रसंगी काढले.

त्यांनी सागितले की, प्रत्येक विद्यार्थ्याची बौद्धिक पटली वेगवेगळी असते. त्यामुळे यश मिळविण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न करायला पाहिजे. प्रत्येकामध्ये स्मरणशक्ती उपजत असते. कोणत्याही औषधाने ती वाढविता येत नाही. योग्य प्रकारे तिला वळण देवून तिचा उपयोग आपल्या प्रगतीसाठी आपण करू शकतो. अभ्यासाव्यतिरिक्त नोकरी आणि व्यवसाय करतांना सुद्धा तिचा उपयोग होत असतो. स्मरण शक्तीच्या विकासासाठी मनाची एकाग्रता अत्यंत महत्वाची आहे.

स्मरणशक्ती वाढविण्यासाठी सूत्रे :

१) एखादा विषय पूर्ण एकाग्रतेने ऐका किंवा बघा.

२) छोट्या आणि मोजक्या शब्दात नोट्स बनवा.

३) अभ्यासाच्या वेळांमध्ये अंतर ठेवा.

४) दररोज व्यायाम, योग, ध्यान करा.

५) रात्री लवकर झोप व सकाळी लवकर उठा.

६) आपला आहार चांगला ठेवावा.

हे सर्व जर आपण केले तर आपल्या अंतर्मनाचा भाग जास्तीत जास्त बाह्य मनाच्या  पृष्ठभागावर येत असल्याने स्मरणशक्तीचा  जबरदस्त विकास होते असा मोलाचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

एसडी सीड समन्वयक प्रवीण सोनवणे यांनी एसडी सिडच्या कार्याचा आढावा सांगितला त्यात त्यांनी सांगितले कि, एसडी सीडचा अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याचा मानस आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या कौशल्य विकास, वेळेचे नियोजन, इंग्रजी संभाषण कौशल्य, ध्येय निश्चिती, परीक्षेला सामोरे जातांना यासारख्या महत्वाच्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमधील सुप्त कौशल्यांचा विकास होणेसाठी तसेच शिक्षक आणि पालकांसाठीसुद्धा योग्य ते समुपदेश व्हावे यासाठी शिक्षण प्रणालीमधील विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या तिन्ही घटकांवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करून शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी आणि एक यशस्वी, संस्कारक्षम समाज निर्मितीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न एसडी सीडच्या माध्यमातून केले जात आहेत.

हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रेमाबाई जैन विद्यालयाचे  मुख्याध्यापक आणि विद्यालयाचे  व्यवस्थापन यांच्या बद्दल एसडी-सीड गव्हार्निग बोर्ड चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महल, पाकिजा आणि रजिया सुल्तान यासारखे भव्य व कलात्मक चित्रपटांची रचना करणारे निर्माता दिग्दर्शक कमाल अमरोही यांचा आज स्मृतिदिवस

Next Post

शहरातील क्रीडा संकुलातील सार्वजनिक शौचालयांची अवस्था बिकट- महिलांची होतेय गैरसोय

Next Post
शहरातील क्रीडा संकुलातील सार्वजनिक शौचालयांची अवस्था बिकट- महिलांची होतेय गैरसोय

शहरातील क्रीडा संकुलातील सार्वजनिक शौचालयांची अवस्था बिकट- महिलांची होतेय गैरसोय

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo