Tuesday, June 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/02/2022
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

‘मेरी आवाज ही, पहचान है… या स्वरमय सूरांनी दिला लतादीदींना अखेरचा निरोप’

मुंबई, दि.६ : नाम गुम जायेगा, चेहरा ये बदल जायेगा, मेरी आवाज़ ही, पहचान है, गर याद रहे, वक़्त के सितम, कम हसीं नहीं, आज हैं यहाँ, कल कहीं नहीं, वक़्त से परे अगर, मिल गये कहीं, मेरी आवाज़ ही पहचान है….या संगीतमय धूनीच्या स्वरमय वातावरणात स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना अखेरचा निरोप देण्यात आला. दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पार्थिवाला शासकीय इतमामात, मंत्रोच्चारात अग्नि देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. बंदुकीच्या फैरींची सलामी देऊन जवानांनी यावेळी मानवंदना दिली.

यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या वतीने जवानांनी पुष्पचक्र अर्पण केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,रश्मी ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्री पियूष गोयल, राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ,गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस,खासदार सुप्रिया सुळे,खासदार अनिल देसाई, मनसे अध्यक्ष राज ठाकरे,आमदार सुनील प्रभू, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मिलिंद नार्वेकर, महापालिका आयुक्त इकबाल सिंह-चहल तसेच लता मंगेशकर यांच्या कुटूंबातील ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर,भारतरत्न सचिन तेंडुलकर, लेखक-गीतकार जावेद अख्तर, गायिका अनुराधा पौडवाल, अभिनेता शाहरुख खान,अमीर खान,रणबीर कपूर,गायक शंकर महादेवन, तसेच चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी आदरांजली वाहिली.

स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे पार्थिव तिरंग्यात लपेटण्यात आले होते. सैनिकांनी यावेळी बंदुकीच्या फैरी हवेत झाडून मानवंदना दिली.

त्यांच्या राहत्या घरी प्रभुकुंज येथून दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान पर्यंत फुलांनी सजलेल्या वाहनातून अंत्ययात्रा काढण्यात आली होती. या अंत्ययात्रेसोबत त्यांचे निकटवर्तीय होते. भारतरत्न लता मंगेशकर यांचे असंख्य चाहते उपस्थित होते, यावेळी अनेकांना लतादीदींना निरोप देताना अश्रू अनावर झाले होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सोमवारपासून पहिली ते आठवीचे वर्ग पूर्णवेळ सुरू होणार; शासनाच्या निर्देशानुसार क्रीडा स्पर्धांना परवानगी द्या – उपमुख्यमंत्री अजित पवार;पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठक

Next Post

श्रीकांतशिंदे फाउंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा समन्वयक पदी डॉ.मोईज देशपांडे

Next Post

श्रीकांतशिंदे फाउंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा समन्वयक पदी डॉ.मोईज देशपांडे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo