Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने प्रत्येक जिल्ह्यात स्मारक उद्यान उभे करावे -राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
20/09/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने प्रत्येक जिल्ह्यात स्मारक उद्यान उभे करावे -राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर

पुणे(प्रतिनिधी)- स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने प्रत्येक जिल्ह्यात स्मारक उद्यान उभे करावे तसेच जिल्हा वार्षिक योजनेतून लोकोपयोगी व जनहिताची कामे करण्यासाठी प्राधान्य देत शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार खर्च होईल याबाबत दक्षता घ्यावी, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिल्या.

कोरोना कालावधीतील कार्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात पुणे महसूल विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर या पाच जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामाबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, नियोजन उपायुक्त संजय कोलगणे, आणि संबंधित जिल्ह्याचे जिल्हा नियोजन अधिकारी तसेच विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

श्री. क्षीरसागर म्हणाले, जिल्हा वार्षिक योजना व नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत जनहिताच्या कामाला प्राध्यान्य देण्यात यावे. अनुसुचित जाती वस्ती सुधार योजनेचा निधी त्याच योजनेसाठी व त्याच कामासाठी खर्च करण्यात यावा. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे कार्य व विचाराच्या प्रचार प्रसारासाठी विविध उपक्रम घेण्यात यावेत. तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने प्रत्येक जिल्ह्यात स्मारक उद्यान उभे करून यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्राची उभारणी, ओपन जीम, कलादालन आदी विकासकामे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून करावी, असेही त्यांनी सांगितले.

कोरोना कालावधीत पुणे विभागात कोरोना प्रतिबंधासाठी चांगले कार्य झाले असल्याचे सांगून श्री. क्षीरसागर म्हणाले, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, महसूल आणि पोलीस विभाग, स्वयंसेवी संस्था, विविध शासकीय विभाग आणि पत्रकारांनी कोरोना लढ्यात चांगली कामगिरी केली. कोरोना रुग्णांना उपचारासाठी वाढीव बील आकारणी झाले असेल त्या ठिकाणी पुन्हा लेखा परिक्षण करण्यात यावे. तसेच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत त्यादृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.

Team Satymev Jayate

Previous Post

परीक्षा निकालाबाबत विद्यार्थ्यांनी २५ सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदविण्याचे आवाहन

Next Post

शहीद वीर जवान सोमनाथ मांढरे यांच्या पार्थिवावर आसले येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Next Post
शहीद वीर जवान सोमनाथ मांढरे यांच्या पार्थिवावर आसले येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शहीद वीर जवान सोमनाथ मांढरे यांच्या पार्थिवावर आसले येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo