Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त 31 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार जिल्हा व राज्यस्तरावरील निवडक लाभार्थ्यांशी संवाद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/05/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त 31 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार जिल्हा व राज्यस्तरावरील निवडक लाभार्थ्यांशी संवाद


जळगांव, दि.29 (जिमाका):- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे मंगळवार, 31 मे 2022 रोजी सकाळी 10.15 ते 10.50 या वेळेत राज्य आणि जिल्हा कार्यक्रमांच्या स्वरूपात तर सकाळी 11 ते दुपारी 12.10 या कालावधीत सिमला (हिमाचल प्रदेश) येथून केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहातून थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.

पंतप्रधान श्री.मोदी यांचा परिसंवाद कार्यक्रम दोन भागांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. संवादाचा पहिला भाग राज्य आणि जिल्हा कार्यक्रमांच्या स्वरूपात सकाळी 10.15 वाजता सुरु होईल आणि सकाळी 10:50 वाजता समारोप होणार आहे.
संवादाच्या दुसऱ्या भागात राज्य आणि जिल्हा स्तरावरील कार्यक्रम शिमला येथील राष्ट्रीय कार्यक्रमाशी जोडला जाणार असून पंतप्रधान श्री.मोदी हे निवड केलेल्या योजनांच्या जिल्ह्यांसोबत निवडक लाभार्थ्यांशी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत.
या राष्ट्रीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन आणि इतर राष्ट्रीय स्तरावरील चॅनेलवर केले जाणार असून युट्यूब आणि NIC चॅनलद्वारे वेबकास्ट देखील केले जाणार आहे.
तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री महोदय हे प्रधानमंत्री आवास योजना (शहरी व ग्रामीण), प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, पोषण अभियान, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण व शहरी), जलजीवन मिशन, अमृत योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, एक राष्ट्र- एक रेशन कार्ड, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, आयुष्यमान भारत हेल्थ ॲण्ड वेलनेस सेंटर, प्रधानमंत्री मुद्रा योजना आदी 13 योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

सावदा येथे “आसेम” तर्फे आयोजीत सामूहिक विवाह सोहळ्यात 8 जोडप्याचे शुभमंगल;मान्यवरांची उपस्थिती

Next Post

जैन हिल्स येथे १ ते ५ जून दरम्यान फालीचे ८ वे संम्मेलन

Next Post
जैन हिल्स येथे १ ते ५ जून दरम्यान फालीचे ८ वे संम्मेलन

जैन हिल्स येथे १ ते ५ जून दरम्यान फालीचे ८ वे संम्मेलन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d