Sunday, June 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्व. कांताबाई जैन यांच्या 14 व्या स्मृतिदिनानिमित्त 549 सहकाऱ्यांनी केले उत्स्फूर्त रक्तदान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

शिवतीर्थ मैदानासह विविध संस्थांमध्ये अन्नदान

जळगाव(प्रतिनिधी)- जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांच्या पत्नी स्व. सौ. कांताबाई जैन यांच्या 14 व्या स्मृतिदिनानिमित्त ‘रक्तदान हाच खरा आत्मसन्मान’ या उपक्रमाद्वारे परिवारातील सदस्य व कंपनीच्या सहकाऱ्यांनी स्वयंस्फूर्त सहभाग घेत  विक्रमी  रक्तदानाचा पायंडा कायम ठेवला.  कंपनीतील  सर्व सहकाऱ्यांशी अत्यंत  जिव्हाळ्याने  स्नेह ठेवणाऱ्या कांताईंच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सर्वांच्या मनात निस्सिम आदर आहे. या कृतज्ञतेतून उत्स्फूर्तपणे यावर्षी 549 सहकाऱ्यांनी रक्तदान केले. शिवाय कांताबाई जैन यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवतीर्थ मैदानासह विविध संस्थांमध्ये अन्नदान करण्यात आले.

स्व. कांताबाई जैन यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्लास्टीक पार्क येथे आयोजित रक्तदान शिबीरात रक्तदान करताना विपणन प्रमुख अभय जैन. सोबत डावीकडून किशोर बोरसे, डॉ. राजकुमार जैन, राजेश आगीवाल, राजेंद्र हजारे, सी.एस. नाईक, डॉ. अनिल पाटील, डॉ. ज्ञानेश्वर पाटील, राजश्री पाटील आदी.

समाजातील गरजू व्यक्तिंना रक्ताचा तुटवडा भासू नये या उद्देशानेदरवर्षी त्यांच्या  स्मृतिप्रित्यर्थ 6 सप्टेंबर रोजी कंपनीत  भव्य  रक्तदान  शिबीर आयोजिले जाते.  अशाच पद्धतीचे रक्तदान  शिबीर स्व. हिरालालजी जैन  यांच्या स्मृतिदिनी 9 मार्च  ला देखील करण्यात येते. यात देखील सहकारी उत्स्फूर्त सहभागी होतात. सकाळी 08 ते सायंकाळी 6.30 पर्यंत चाललेले हे महारक्तदान  शिबीराचे आयोजन भारत भरातील  कंपनीच्या प्रमुख  आस्थापनांमध्ये करण्यात आले होते. यात टि.सी.पार्क व जैन  प्लास्टिक पार्क येथे 291, जैन अग्री पार्क, एनर्जी पार्क, फूड पार्क डिव्हाईन पार्क मिळून 152, चित्तूर 30, उदमलपेठ 31,  बडोदा 10, अलवर 10, हैदराबाद 9 आणि कांताई नेत्रालय येथे  16 सहकाऱ्यांनी रक्तदान केले.जळगावमध्ये जैन प्लास्टिक पार्क-बांभोरी, जैन  फूडपार्क, कांताई मंगल कार्यालय  येथे आणि  भारतातील चित्तुर, बडोदा,  हैद्राबाद,  उदमलपेठ  या ठिकाणी  देखील जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनी रक्तदान केले.

जैन फुडपार्क येथील एडमीन ऑफीसच्या सभागृहात व  प्लास्टिक पार्क येथे डेमो बिल्डींग हॉल येथे स्व.कांताबाई जैन  यांच्या प्रतिमेला श्रद्धांजली अर्पण करून रक्तदान  शिबीराचा  शुभारंभ झाला. या भव्य रक्तदान शिबिरातील ह्यावर्षी लायन्स क्लब जळगाव सेंट्रल ही सेवाभावी संस्थासुद्धा ह्या पवित्र कार्यात सहभागी झाली. रक्त संकलनासाठी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंडियन रेडक्रॉस सोसायटी, माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी आदी संस्थांनी रक्त संकलन केले.

प्लास्टीक पार्क येथे अभेद्य अजित जैन यांच्याहस्ते प्रतिमा पूजन  करण्यात आले.  याप्रसंगी  इंडयन रेडक्रॉस सोसायटीचे प्रसन्नकूमार रेदासनी, गनी मेमन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे संदीप साबळे, कंपनीचे वरिष्ठ सहकारी सी. एस. नाईक, व्ही. एम. भट, राजेंद्र हजारे, डॉ. अनिल पाटील, डॉ. ज्ञानेश्वर पाटील, दिलीप सांखला, राजेश आगीवाल, किशोर बोरसे उपस्थीत होते. तर जैन फूडपार्क येथे विजय मुथा  यांच्या हस्ते प्रतिमा पूजन  करण्यात आले. याप्रसंगी ज्योती जैन, निशा जैन, डॉ. शोभना जैन, अभंग जैन, चंद्रकांत जैन, सुनिल गुप्ता,  जी. आर. पाटील, आर. डी. पाटील, बी. एम. खंबायत, आर. जी. इंगळे, डॉ. बी. के., डॉ. संदीप पाटील उपस्थित होते. यावेळी लायन्स क्लब जळगाव सेंट्रलचे अध्यक्ष अनिल पगारिया, शिरीष सिसोदिया, जयेश ललवाणी, आनंद श्रीश्रीमाळ, मनोज जैन, किशोर बेहराणी, मनोज जैन, मनिष मंडोरा, पराग लुंकड, विपुल शहा, जगदिश जाखेटे, दर्शन टाटिया, सचिन जाखेटे, अविनाश कक्कड, दिनेश बाफना यांनीही रक्तदान शिबिरात सहभाग घेतला.

जैन परिवारातील अतुल जैन, अभय जैन, अविनाश जैन, अभेद्य जैन, अभंग जैन, ज्योती जैन, निशा जैन यांनी रक्तदान केले.  सहकाऱ्यांची कंपनीप्रती असलेली आस्था  व  स्व.कांताईंच्या प्रती असलेली श्रद्धा याचे हे महारक्तदान शिबीर द्योतक आहे. सहकाऱ्यांचे यासाठी असलेले  योगदान कंपनीच्या  सामाजिक  बांधिलकी दृढ करणारे आहे.  अशा शब्दात  जैन  इरिगेशनचे  अध्यक्ष अशोक जैन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

2000 गरजूंनी घेतला मिष्टान्नाचा लाभ

स्व.सौ.कांताबाई जैन यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवतीर्थ मैदानावर गरजूसाठी अन्नदानाचा कार्यक्रम आयोजिला होता. याठिकाणी  कांताईंच्या प्रतिमेचे पूजन जैन परिवारातील ज्येष्ठ सदस्य संघपती दलिचंदजी जैन यांच्याहस्ते करण्यात आले.  याप्रसंगी कंपनीचे  अध्यक्ष  अशोक जैन, विपणन प्रमुख अभय जैन, शशिकांत जैन, प्रविण जैन यांच्यासह जैन परिवारातील सुना व कंपनीचे सहकारी उपस्थीत होते. याप्रसंगी नवकार मंत्राचा जाप करण्यात आला. परिवारातील सदस्यांच्या हस्ते अन्नदान करण्यात आले.  याप्रसंगी  सुमारे  2000 गरजूंनी मिष्टान्नाचा लाभ घेतला.  याशिवाय बालसुधार गृह, जय जलाराम गायत्री मंदीर, बाबा हरदासराम, शिवकॉलनीतील बालकश्रम, सिंधी कॉलनीतील अंध शाळा, सावखेडा  येथील  मातोश्री  वृद्धाश्रम येथे अन्नदान  करण्यात  आले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सभापती पुरस्कृत आदर्श शिक्षक सन्मान सोहळा संपन्न

Next Post

जिल्हा कारागृह आहे की;हाणामारी गृह?

Next Post
जिल्हा कारागृह आहे की;हाणामारी गृह?

जिल्हा कारागृह आहे की;हाणामारी गृह?

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo