Sunday, June 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्व.कांताबाई जैन साहित्य कला जीवन गौरव पुरस्कार पहिला पुरस्कार जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना जाहीर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

व्दिवार्षिक पुरस्काराचे स्वरूप  2 लाख रुपये, सन्मानचिन्ह

जळगाव- (प्रतिनिधी) – जैन इरिगेशनची सेवाभावी संस्था भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या सुविद्य पत्नी स्व. कांताबाई यांच्या स्मृतिदिनी स्व. कांताबाई जैन साहित्य-कला जीवनगौरव या नवीन पुरस्काराची घोषणा साहित्य पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक ज्ञानपीठकार डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी केली. हा व्दिवार्षिक पुरस्कार असून 2 लक्ष रुपये, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे याचे स्वरूप असेल. पहिल्या पुरस्काराचे मानकरी खान्देशातील धुळे गोंदूर येथे जन्मलेले ज्येष्ठ शिल्पकार, मूर्तिकार राम सुतार यांना जाहीर झाला आहे. कला आणि साहित्य क्षेत्रातील अखिलभारतीय स्तरावरील कर्तृत्ववान ज्येष्ठ व्यक्तिची निवड या पुरस्कारासाठी केली जाणार आहे.

बहिणाई पुरस्कार, बालकवी ठोमरे पुरस्कार, ना. धों. महानोर पुरस्कार असे व्दिवार्षिक पुरस्कार निवडीसाठी साहित्य निवड समितीची बैठक डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली 4 सप्टेंबर रोजी घेण्यात आली. विशेष आमंत्रित म्हणून जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, ना. धों. महानोर, निवड समिती सदस्य राजन गवस, प्रभा गणोरकर, अनुराधा पाटील, शंभू पाटील हे सदस्य उपस्थित होते. या बैठकीत हा पुरस्कार देण्याचे सर्वानुमते ठरले त्यानुसार हा पहिला पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे.

थोर कलावंत, साहित्यिकांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन म्हणजे ‘स्व. कांताबाई जैन साहित्य कला जीवन गौरव पुरस्कार’

“साहित्यिक-कलाकार आपल्या कलेच्या, कलाकृतींच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक जीवन समृद्ध करीत असतात. लेखकाने लिहिलेल्या कलाकृतीतून आयुष्याची वाटचाल बदलण्याचे सामर्थ्य साहित्यकृतीत असते. कधी दगडातील शिल्प अंतरात्म्याला स्पर्श करते, तर कुंचल्यातून विविधरंगी छटांच्या मीलनातून जिवंत सृष्टी साकार होते. थोर कलावंत, साहित्यिकांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन म्हणजे ‘स्व. कांताबाई जैन साहित्य कला जीवन गौरव पुरस्कार’ होय. माझ्या आईने वाचन संस्कृती जोपासली होती. आजही तिने संकलित केलेली–वाचलेली 500 च्यावर पुस्तके घरातील ग्रंथालयात आहेत. आई-वडिलांकडून मिळालेला वाचनसंस्कार मनाची जडणघडण करणारा आहे. कलेकडे पाहण्याची दृष्टीही त्यांच्यामुळे संस्कारित झाली. साहित्यिक-कलावंतांविषयी आदरभाव त्यांच्या संस्कारांमुळेच निर्माण झाला. प्रस्तुत पुरस्कार त्याच कृतज्ञतापूर्वक सद्भावनेने अर्पण करीत आहोत”.

–अशोक जैन, अध्यक्ष जैन इरिगेशन जळगाव.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सुशिक्षित बेरोजगार तरुणांनो जागे व्हा…

Next Post

भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, जळगाव’ पुरस्कृत ‘साहित्य पुरस्कार-2019’साठी प्रतिभावंत साहित्यिकांची निवड

Next Post
भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, जळगाव’ पुरस्कृत ‘साहित्य पुरस्कार-2019’साठी प्रतिभावंत साहित्यिकांची निवड

भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, जळगाव’ पुरस्कृत ‘साहित्य पुरस्कार-2019’साठी प्रतिभावंत साहित्यिकांची निवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo