Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

हिंगणघाट पीडितेला रायसोनी महाविद्यालयात श्रद्धांजली

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
हिंगणघाट पीडितेला रायसोनी महाविद्यालयात श्रद्धांजली

जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविध्यालयात हिंगणघाट पीडितेला श्रद्धांजली अर्पण करताना प्राध्यापक व विध्यार्थी

जळगाव: येथील जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात हिंगणघाट येथील घटनेत दुर्दैवी अंत झालेल्या पीडितेला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संगणक विभाग प्रमुख प्रा. सोनल पाटील यांनी ही श्रद्धांजली सभा आयोजित केली होती.

पुरोगामी महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजिरवाणी अशी बाब व काळा दिवस असल्याच्या भावना प्रा. सोनल पाटील यांनी व्यक्त केली. आपल्या घरात महिलांवर असे अत्याचार करणारे विकृत जन्माला येऊ न देणे हीच तिच्यासाठी खरी श्रद्धांजली आहे, असेही त्या म्हणाल्या. या घटनेचा खटला जलदगतीने चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जी. मॅथ्यू यांनी महिलांवरील अत्याचाराच्या घटना टाळायच्या असतील, तर न्यायव्यवस्थेने अशा खटल्यांचा जलद न्यायनिवाडा करून नराधमांना कठोर शिक्षा द्यावी जेणेकरून भविष्यात असे कृत्य करायची कुणाची हिंमत होणार नाही, असे सांगितले. तसेच रायसोनी इस्टट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनीसुद्धा माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेचा निषेध करून श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर सर्वांनी दोन मिनिटे मौन ठेवून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी प्रा. हिरालाल साळुंखे, प्रा. स्वाती पाटील, प्रा. शीतल जाधव, प्रा. स्वप्नील देशमुख आदि  शिक्षकवृंद, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प.वि.पाटील विद्यालयात आनंद मेळाव्याची धूम

Next Post

पी.आर.हायस्कूल ला रंगली गीतगायन स्पर्धा

Next Post
पी.आर.हायस्कूल ला रंगली गीतगायन स्पर्धा

पी.आर.हायस्कूल ला रंगली गीतगायन स्पर्धा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo