Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त विधानभवनात अभिवादन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
17/11/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त विधानभवनात अभिवादन

मुंबई(प्रतिनिधी)- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या 9 व्या स्मृती दिनानिमित्त आज विधानभवन येथे त्यांच्या प्रतिमेस विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज 9 वा स्मृतीदिन विधान भवन येथे पहिल्यांदाच साजरा करण्यात आला.

महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी, व्यंगचित्रकार, संपादक असे उत्तुंग व्यक्तीमत्त्व ज्यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत योगदान होते. शिवसेना पक्षसंघटनेच्या माध्यमातून मराठी अस्मिता, महाराष्ट्राचा स्वाभिमान ज्वलंत ठेवणाऱ्या अशा महान नेतृत्वास स्मृतीदिनानिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अभिवादन केले.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, आमदार सर्वश्री नाना पटोले, अशोक पवार, अभिजीत वंजारी, अमोल मिटकरी, सरोज अहिरे, विक्रम काळे, कपिल पाटील, श्रीमती यामिनी जाधव, श्रीमती मनिषा कायंदे, निर्मला गावित, विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, उपसचिव राजेश तारवी, अवर सचिव रवींद्र जगदाळे, सुनिल झोरे, पुनम ढगे, सायली कांबळे यांनीही दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी विधिमंडळातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Previous Post

आयटीआयमधील मुलींना मिळणार नाविन्यपूर्ण कौशल्य प्रशिक्षण

Next Post

दिव्यांगाना साहित्य वाटपाचा उपक्रम कौतुकास्पद -बच्चू कडू

Next Post
दिव्यांगाना साहित्य वाटपाचा उपक्रम कौतुकास्पद -बच्चू कडू

दिव्यांगाना साहित्य वाटपाचा उपक्रम कौतुकास्पद -बच्चू कडू

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo