Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

हृदयरोगापासून बचाव विषयावर डॉ. रमेश कापडीया यांचे व्याख्यान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/10/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

गांधी रिसर्च फाऊंडेशन व रोटरी क्लब जळगाव चा उपक्रम

जळगाव दि.30 प्रतिनिधी – येथील रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदाबाद येथील जागतिक कीर्तीचे हृदयरोग तज्ज्ञ व युनिव्हर्सल हिलींग प्रोग्रॅमचे जनक डॉ. रमेश कापडीया यांचे “हृदयरोगापासून बचावाचे प्राथमिक उपचार” विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. गणपती नगरातील रोटरी क्लब जळगावच्या सभागृहात सोमवार, दि. ३१ ऑक्टोबर २०२२ ओजी सायंकाळी ६.०० ते ७.३० वेळात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून मोठ्या संख्येने उपस्थितीचे आवाहन आयोजक संस्थांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

हृदयविकारांमुळे होणाऱ्या मृत्यूंचे चिंताजनक प्रमाण , त्यामामागची कारणे व त्यापासून बचावाची प्राथमिक माहिती याबाबत फारच कमी लोकांना माहिती असते. यासाठीच या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. तरुणांमधील वाढते हृदयरोगाचे प्रमाण लक्षात घेता हे व्याख्यान युवकांसाठीही लाभदायक ठरणार आहे. अहमदाबाद येथील रहिवासी असलेले ८९ वर्षीय डॉ. रमेश कापडीया १९६४ पासून हृदयरोग्यांवर उपचार करीत आहेत. १९९१ पासून ते औषधोपचारांसह युनिव्हर्सल हिलींग प्रोग्रॅमचा वापर करीत आहे.

हजारोवर रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे. महात्मा गांधींनी स्थापन केलेल्या गुजरात विद्यापीठात विज्ञान व अहिंसा विषयाचे सहायक प्राध्यापक म्हणून ते अध्यापनाचे कार्य करीत आहेत. १९९८ साली त्यांना प्रतिष्ठित अशा अशोक गोंधिया ताबीबी सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी देश-विदेशात व्याख्याने दिली आहेत. आपल्या पाच दशकांच्या अनुभवावरून युनिव्हर्सल हिलींग प्रोग्रॅम हा पर्याय नसून आवश्यक पूरक घटक असल्याचे सिद्ध केले आहे. त्यांची या विषयावरील ९ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

के सी ई आय एम आर मध्ये “स्वावलंबी भारत कार्यशाळा

Next Post

तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाची निवडणूक जाहीर

Next Post

तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाची निवडणूक जाहीर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo