Tuesday, June 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

१९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबरपर्यंत पोलीस अधिनियमांतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/11/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
१९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबरपर्यंत पोलीस अधिनियमांतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू

जळगाव – (जिमाका) – भारत निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 18 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 पासून प्रचार बंद झाला आहे. जळगाव जिल्हयाकरिता मतदानपुर्वीच्या आदल्या दिवसापासुन म्हणजेच 18 नोव्हेंबर पासुन ते मतदान संपल्यानंतरच्या एका दिवसापर्यंत म्हणजेच 21 नोव्हेंबर रात्री बारा वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक लोकांचा जमाव जमविण्यावर एकत्रितपणे वावरण्यावर प्रतिबंध असणार आहे. असे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहे.

दरम्यान कडक आचारसंहितेच्या काळात शुल्लक कारणावरुन देश विघातक कृत्य करणारे समाज कंटक, जातीय गुंड हे याचा फायदा घेऊन किंबहुना समाजात तेढ निर्माण होईल, अशांतता निर्माण होईल अशा प्रकारचे कृत्य करण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी किरकोळ कारणावरुन कोणताही अनुचित प्रकार घडु नये म्हणुन जळगाव जिल्हयात 19 नोव्हेंबर चे 00.01 वाजेपासून ते 3 डिसेंबरच्या 24.00 वाजे पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) चे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहे.

याकाळात शस्त्र, सोटे, भाले, तलवारी, बंदुका, सुरे, लाठया व काठ्या किंवा शारीरिक दुखापती करण्यांसाठी वापरात येतील अशी कोणतीही हत्यारे अथवा वस्तु घेऊन फिरण्यावर बंदी असणार आहे. अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ अथवा द्रव्ये बरोबर घेऊन फिरणे, दगड अगर इ. अस्त्रे किंवा शस्त्रे सोडावयाची अगर फेकावयाची हत्यारे, साधने इ. तयार, जमा करणे, आणि बरोबर नेण्यास बंदी आहे. तसेच कोणत्याही इसमाच्या चित्रांचे प्रतिकात्मक. प्रेताचे किंवा पुढा-यांच्या चित्रांचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे, सार्वजनिक रित्या ओरडणे, किंवा विक्षिप्तपणे हावभाव करणे, सभ्यता अगर नितीमत्ता विरुध्द असतील अशी किंवा शांतता धोक्यात आणतील अशी भाषणे, हावभाव करणे, सोंग आणणे आणि तशी चिन्हे, चित्रे, फलक, इ. लावणे किंवा इतर कोणतेही असे जिन्नस अगर वस्तु तयार करणे किंवा त्यांचा प्रसार करणे या कृत्यांना बंदी असणार आहे.

यात केवळ ज्यांना हातात लाठी किवा तत्सम वस्तु घेतल्याशिवाय चालता येत नाही. अशा वृध्द अथवा अपंग इसमांना लागु असणार नाही. असे आदेशात म्हटले आहे.
पोलीस अधिक्षक यांच्या पूर्व परवानगी शिवाय पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास, सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी असणार आहे. हा आदेश शासकीय कार्यक्रम, प्रेत यात्रा व लग्न मिरवणुका तसेच धार्मिक मिरवणुका यांना लागु राहणार नाही. तसेच हा आदेश शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य पुर्तीसाठी हत्यारे बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू राहणार नाही आहे. असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी भिमराज दराडे यांनी एका पत्रकाद्वारे दिले आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

रावेर विधानसभा मतदारसंघातील पोलिंग अधिकारी यांच्या खाजगी वाहनाला अपघात

Next Post

उद्या सुट्टीचा दिवस नाही तर…हक्क, कर्तव्य, जवाबदारी चा दिवस-ॲड. सुरेश ए पाटील

Next Post
उद्या सुट्टीचा दिवस नाही तर…हक्क, कर्तव्य, जवाबदारी चा दिवस-ॲड. सुरेश ए पाटील

उद्या सुट्टीचा दिवस नाही तर...हक्क, कर्तव्य, जवाबदारी चा दिवस-ॲड. सुरेश ए पाटील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo